बेळगाव :‘सेकंड कॅपिटल’ला सेकंडहँड बसगाड्या

बेळगाव :‘सेकंड कॅपिटल’ला सेकंडहँड बसगाड्या
Published on
Updated on

बेळगाव;  पुढारी वृत्तसेवा : राज्याची दुसरी राजधानी म्हणून ओळख असलेल्या बेळगावला सेकंड हॅन्ड बस दिल्या जात आहेत. वायव्य परिवहन महामंडळाच्या 2,400 बस कालबाह्य झाल्या आहेत. नवीन बस घेण्यासाठी अनुदान मिळत नसल्याने जुन्या बसचा वापर करण्यात येत आहे. त्यामध्ये पुन्हा बंगळुरातील भंगारात निघालेल्या 20 बसची भर पडणार आहे. त्यामुळे बेळगावातील प्रवाशांना सेकंड हॅन्ड बसमधून प्रवास करावा लागणार आहे. नवीन 1500 बसची गरज असून त्या मिळवण्यासाठी परिवहन महामंडळ सरकारकडे पाठपुरावा करत आहे.

परिवहन महामंडळाच्या नियमानुसार 9 लाख कि.मी. धावलेल्या बस कालबाह्य करण्यात येतात. बेळगाव आगारातील निम्म्याहून अधिक बसेस कालबाह्या झाल्या आहेत. या सर्व बसेस प्रवासासाठी असुरक्षित आहेत. असे तांत्रिक विभागाने स्पष्टपणे नमूद केले. परिवहनच्या 53 युनिटमध्ये 4,800 बसेस कार्यरत आहेत. त्यापैकी 2,400 हून अधिक बसेसनी 9 लाख कि.मी.चा अंतर पार केले आहे. 600 बससेनी 13 लाख कि.मी अंतर कापले आहे. याशिवाय बेळगाव जिल्ह्यातील 665 बसेस कालबाह्य झाल्या आहेत. जुन्या बसेस बंद करून नवीन बस खरेदी करण्यासाठी परिवहन महामंडळाकडे पैसे नाहीत. राज्य सरकार अनुदानही देत नाही. त्यामुळे परिवहन महामंडळाची मदार ही जुन्या बसवरच आहे. पावसाळ्यात तर अनेक बसला गळती लागल्यामुळे प्रवाशांचेच नव्हे तर वाहनचालकांचेही हाल होत आहेत.

भंगारातील 20 बसची खरेदी

बंगळूरमध्ये दहा वर्षे वापरलेल्या सुमारे 8 ते 9 लाख किलोमीटर धावलेल्या बस भंगारात काढण्यात आल्या आहेत. यातील 20 बस बेळगावात धावणार असल्याची माहिती मिळाली आहे. बंगळूर महानगर परिवहन महामंडळाने सुमारे 10 वर्षे वापरलेल्या 25 हजार बस भंगारात काढल्या आहेत. वायव्य परिवहन महामंडळाने या बस खरेदी केल्या आहेत. त्या बस दुरुस्त करुन बेळगावात धावणार आहेत. 8 ते 9 लाख कि. मी. धावलेल्या बस प्रवासासाठी धोकादायक असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या बस भंगारात काढल्या जातात. आता या बस दुरुस्त करुन वापरण्यात येणार आहेत.

बसबाबत अनेकांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. 1500 बस खरेदीसाठी विशेष अनुदान द्यावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. जुन्या बसेसची नियमित दुरुस्ती केली जात आहे.
– पी. व्ही. नायक, विभागीय नियंत्रण संचालक, बेळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news