बेळगाव
बेळगाव : अपघातात दोन सख्ख्या बहिणी ठार
जमखंडी (पुढारी वृत्तसेवा) : दुचाकीला कारने मागून धडक दिल्याने सख्ख्या भगिनी जागीच ठार झाल्याची दुर्घटना जमखंडी तालुक्यातील आलगूरजवळ घडली.
भावाला शाळेला पोचवून घरी परतत असता हा अपघात झाला. भाग्यश्री महावीर खिद्रापूर (वय 18), तनुश्री महावीर खिद्रापूर (वय 3) अशी मृतांची नावे आहेत. दुचाकीवरून आलगूरकडे येत असता मागून कारची धडक बसून हा अपघात झाला. जमखंडी सीपीआय आय. एम. मठपती यांनी अपघातस्थळी पाहणी केली. अपातानंतर कारचालक फरारी आहे.

