

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना आधार ठरलेल्या रोजगार हमी योजनेतील कामगारांना गुढी पाडव्याची सरकारकडून भेट देण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून रोहयो कामगारांच्या मजुरीत 20 रु. वाढ झाली असून आता 309 रु. मजुरी देण्यात येणार आहे. सरकारने मजुरी वाढीचा निर्णय घेतला आहे. याचा राज्यातील कोट्यवधी रोहयो कामगारांना लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारने देशभरात ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजना लागू केली आहे. ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट यातून ठेवण्यात आले आहे. याचा लाभ अनेकांना झाला आहे. वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी कामगारांना देण्यात येणार्या मजुरीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 289 इतकी मजुरी देण्यात येत होती. यामध्ये 20 रुपयाची वाढ केल्याने 309 इतकी मजुरी मिळणार आहे.
तीन वर्षात 60 रु. मजुरीत वाढ मागील तीन वर्षात 60 रु. ने मजुरीत वाढ झाली आहे. 2019 मध्ये 249 रु. मजुरी देण्यात येत होती. त्यानंतर 2022 मध्ये ही मजुरी 309 इतकी झाली आहे. यामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे. सरकारने कामगारांना सतत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळी विकासकामे हाती घेतली आहेत. राज्यातील 6,021 ग्राम पंंचायतींच्या कार्यक्षेत्रात योजना सुरू आहे. राज्यभरात 'चला कष्ट करुया' अभियान सुरू असून यामध्ये 2.53 कोटी नवीन कामगारांची नोंद करण्यात आली आहे.
मागील अकरा महिन्यात 16.36 कोटी मानवदिन कामे राज्यातील रोजगार हमी योजनेतील कामगारांना पुरवण्यात आली आहेत.
बेळगाव जिल्ह्यात राज्यात सर्वांधिक मानवदिन कामे झाली आहे. 1.51 कोटी मानवदिन कामे झाली आहेत. यातून खेळाची मैदाने, शेततळे, शेत सुधारणा आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. विविध कामांतून कामगारांना काम पुरवण्यात आले आहे.
ोहयोतून बेळगाव जिल्ह्यात 1.51 कोटी मानवदिन काम पुरवण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मानवदिन कामे बेळगाव जिल्ह्यात झाली आहेत. अधिकाधिक कामगारांना काम पुरविण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहेत.
– दर्शन एच. व्ही.,
जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी