बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अपहार प्रकरणी १६९ जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अपहार प्रकरणी १६९ जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी
Published on
Updated on

वडवणी, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अपहार प्रकरणी २०१३ साली १६९ जणांविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गन्हे दाखल करण्यात आले होते. सदरील प्रकराणातील आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने वडवणी न्यायालयाने संबंधित आरोपींविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहेत. अटक वॉरंट जारी केल्याने वडवणी तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील 3 आरोपींना वडवणी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कोट्यावधी रुपयांची लुट करून अनेक राजकीय नेत्यांनी आपले घर भरुन घेतले होते. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन प्रशासक शिवानंद टाकसाळे यांच्या आदेशानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास देशमुख यांच्या फिर्यादीवरून वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

आरोपी न्यायालयात हजर राहुन न्यायालयीन कामकाजात सहकार्य करत नसल्याने वडवणी न्यायालयाने १६९ जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहेत. त्यापैकी तिघांना वडवणी पोलीसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी वडवणी पोलीसांचे पथक रवाना झाले आहे. उर्वरित आरोपींमध्ये वडवणीतील मोठ्या राजकीय नेत्यांचा समावेश असल्याने एैन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news