BCCI vs PCB : भारतातील ‘वर्ल्ड कप’मधून बाहेर पडणार, ‘पीसीबी’ची ‘बीसीसीआय’ला धमकी!

BCCI vs PCB : भारतातील ‘वर्ल्ड कप’मधून बाहेर पडणार, ‘पीसीबी’ची ‘बीसीसीआय’ला धमकी!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs PAK : क्रिकेटच्या मैदानावरील 'महामुकाबला' म्हणून ओळखला जाणारा भारत-पाकिस्तान सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर होणार आहे. मात्र त्याआधीच दोन्ही देशातील क्रिकेट नियामक मंडळे आमने-सामने आले आहेत. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची निवड होताच पहिल्या बैठकीत मंडळाचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघ पुढील वर्षी होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार नाही, असे स्पष्ट केले. त्यांच्या या विधानानंतर खळबळ माजली असून पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळानेही धमक्या देण्यास सुरूवात केली आहे. (BCCI vs PCB after jay shah s statement there was panic in pakistan cricket board)

पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, 'जर भारत पुढील वर्षी आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये आला नाही, तर पाकिस्तान पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही सहभागी होणार नाही.'

पाकिस्तान 13 वर्षांनंतर 2023 मध्ये आशिया कपचे यजमानपद भूषवणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार का? याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. पण नुकत्याच झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत मंडळाचे सचिव जय शहा यांनी पाकला धक्का देत भारतीय संघ पुढील वर्षीची आशिया चषक स्पर्धी पाकिस्तानात जाऊन नाही तर तटस्थ ठिकाणी खेळेल असे स्पष्ट केले. शहा यांच्या विधानानंतर पीसीबीचे अध्यक्ष रमीज राजा संतापले आहेत. त्यांनी बीसीसीआयवर निशाणा साधत, 'असे विधान नियमांच्या विरोधात असून याबाबत आशियाई क्रिकेट परिषदेची तातडीने बैठक बोलावण्यात यावी,' अशी मागणी केली आहे. (BCCI vs PCB after jay shah s statement there was panic in pakistan cricket board)

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हादरले आहे आणि निराश झाले आहे, असे विधान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून बुधवारी जारी करण्यात आले. जय शहा यांनी आशिया चषक तटस्थ ठिकाणी हलवण्याचे केलेले विधान निषेधार्ह आहे. कोणत्याही मंडळाच्या सदस्याशी न बोलता, आयोजक देशाच्या क्रिकेट बोर्डाशी चर्चा न करता केलेले हे विधान खेदजनक आहे. ज्याचे खूप मोठे परिणाम होऊ शकतात, असे म्हटले आहे. (BCCI vs PCB after jay shah s statement there was panic in pakistan cricket board)

पीसीबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत दीर्घ चर्चा आणि समर्थनानंतर आशिया चषक पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता जय शाह यांनी केलेले विधान हे त्या गोष्टींचे उल्लंघन आहे. 1983 मध्ये एशियन क्रिकेट कौन्सिलची स्थापना ज्या भावनेने झाली होती त्याच्या विरोधात शहा यांचे वक्तव्य असल्याचा, आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून पाक क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला थेट धमकी दिली आहे. जय शहा यांच्या वक्तव्यांमुळे आशियाई क्रिकेट देशांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊन दुफळी माजू शकते. याशिवाय 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक किंवा 2031 पर्यंत होणाऱ्या अन्य क्रिकेट सामन्यांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असा इशारा पीसीबीने दिला आहे.

दरम्यान, आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नसल्याने या संदर्भात आशियाई क्रिकेट परिषदेची तातडीने बैठक बोलावण्याची मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या आशिया चषकात काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या मुद्यावर आयसीसीच्या बैठकीतही चर्चिला जाऊ शकतो, असे समजते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news