सातारा : मादक सौंदर्याची मोहिनी; ‘बार-बार’ येण्याची ऑफर

सातारा : मादक सौंदर्याची मोहिनी; ‘बार-बार’ येण्याची ऑफर
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  कास पठाराच्या टापूत रेव्ह पार्टीमध्ये बारबाला नाचवण्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला अन् येथील रंगारंग माहोलाचा पर्दाफाश झाला. 'रात्र धुंदीत घालवा' अशा बेधुंद वातावरणात अंगविक्षेपाने घायाळ करणार्‍या बारबालांवर पैशांची उधळण होत होती. अवघ्या 40 हजार रुपयांमध्ये मुंबई-पुण्याच्या बारबाला आणून त्यांच्यावर लाखो रुपये उधळण्याचा कार्यक्रम मात्र आंबट शौकीनांच्या चांगलाच अंगलटी आला. मादक सौंदयाची मोहिनी घालून 'बार-बार' येण्याची ऑफरच दिली जात असल्याचे समोर आले.

रेव्ह पार्टीचे पेव गेल्या 15 ते 20 वर्षापूर्वी फुटले होते. कॉलेजची पोरं-पोरी 'दम' मारत झिंगाट व्हायची. याच छमक छल्लोची हवा हळूहळू ग्रामीण भागातही पसरली. सातारा परिसर, महाबळेश्वर यासह काही ठिकाणी अक्षरश: डान्सबार सुरू असल्याचेही अनेकदा समोर आले. त्यानंतर काही रेव्ह पार्ट्या पोलिसांनी उधळून लावल्या. गेल्या काही वर्षापासून रेव्ह पार्टी होत असतानाही त्याकडे मात्र अर्थपूर्ण दृष्टीकोनातून दुर्लक्ष होत होते. सातार्‍यातील दोन दिवसांपूर्वीच्या कारवाईने पुन्हा एकदा याची चर्चा चवीने रंगू लागली आहे. यामुळे पोलिसांनी मुळाशी जावून जे फॅड युवकांच्या, व्यवसायिकांच्या मानगुटीवर बसत आहे त्याचा नायनाट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पर्यटनाच्या नावाखाली वावर

कास पठार हे जागतिक वारसास्थळ म्हणून लाभले आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा याठिकाणी असतो. मात्र या नावाखाली अनेक अपप्रवृत्ती वाढू लागल्या आहेत. बारबाला आणून नाचवणे हा त्यातीलच एक प्रकार. यासाठी दलालांची मोठी साखळी कार्यरत आहे. कॉलेजच्या युवती असल्याचे भासवून फिरायला चाललो आहे, अशा पध्दतीने संबंधित युवती कास पठाराकडे येत असल्याचे वास्तव आहे.

50 हजारांत बारबाला फूल नाईट उपलब्ध

बारबालांना कार भाड्यासह 50 हजार रुपये दिल्यानंतर त्या 5 ते 6 तासांंसाठी अगदी फुल्ल नाईटसाठी उपलब्ध होत आहेत. नाचणारे हौशे-गवशे बारबालांवर लाखो रुपये उधळतात. याशिवाय हॉटेल भाडे, खाणे-पिणे वेगळे. असा सर्व टर्नओव्हर एका नाईटमध्ये 5 ते 7 लाख रुपयांपर्यंत जात आहे. ऑर्गनायझर अनेकदा 20 ते 25 जणांना बोलावतो. प्रत्येकाकडून 10 हजार रुपयांप्रमाणे पैसे घेतो. याशिवाय एखादा फायनान्सर पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम देऊन मित्रांना आपले काम करून घेण्यासाठी संबंधितांना खूश ठेवण्यासाठी अशी रक्कम उडवली जात आहे.

आंबटशौकिनांचा पिंगा; बारबालांना एक्स्ट्रा रक्कम…

बारबाला नाचवण्यासाठी कमालीची गोपनीयता बाळगली जाते. जे बैठकीला येणार आहेत त्यांना त्यांचे मोबाईल बंद ठेवायला सांगितले जातात. जागा बंदीस्त तसेच आडबाजूलाच असेल तर क्लायंट फायनल करतात. खोलीमध्ये दरवाजे, खिडक्या पॅक असतात. त्याठिकाणी उंची दारूच्या बाटल्या, सिगारेट, मटण, गाण्यांवर चालणारी सिस्टीम आणि रंगीत लाईट असतात. रात्री दहापासून ते पहाटे दोन वाजेपर्यंत दंगा-धुडगूस सुरू असतो. बारबाला नाचत असताना त्यांच्याभोवती आंबटशौकीन कडेने पिंगा घालतात. आपल्या फर्माईशीचे गाणे लावून बेभान होतात. अनेकदा अशा बारबालांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी स्वतंत्र रुम उपलब्ध असते. त्यासाठी बारबालाला एक्स्ट्रा रक्कम जो तो व्यक्ती देत असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news