

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत मानक ब्युरोद्वारे भारतातील २५ किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानांमधून तब्बल १८६०० खेळणी जप्त करण्यात आली आहेत. गुणवत्ता चिन्ह नसल्याने ही खेळणी गुरुवारी (दि. १२) जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. BSI ने ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करुन हि माहिती दिली आहे. त्याचबरोबर Amazon, Flipkart आणि Snapdeal या कंपन्यांना देखील याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. (Seized Toys)
बीएसआयचे अधिकारी प्रमोद कुमार तिवारी यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आम्हाला याबाबतच्या उत्पादन करणाऱ्या काही कंपन्यांकडून तक्रारी देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार ४४ ठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये तब्बल १८६०० खेळण्यांवर बंदी घातली आहे."अशी माहिती तिवारी यांनी यावेळी दिली.
बाजारात बनावट खेळण्यांची विक्री होऊ नये यासाठी BIS प्रमाणपत्र अनिवार्य करणारा खेळणी (गुणवत्ता नियंत्रण) आदेश जानेवारी 2021 मध्ये लागू करण्यात आला. BIS च्या अधिकार्यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, बाहुल्या आणि स्लाईड यांसारख्या इलेक्ट्रिक आणि नॉन-इलेक्ट्रिक खेळण्यांवर ISI मार्क असणे आवश्यक आहे.
या छापेमारीनंतर, कन्झ्युमर प्रोटेक्शन नियामककडून याबाबत एक सुचना करण्यात आली आहे. Amazon, Flipkart आणि Snapdeal यांना बिएसआय मानांकनाशिवाय कोणतेही खेळणे विक्री केली जाऊ नये याची खबरदारी घ्या, अशी सुचना कन्झ्युमर विभागाकडून देण्यात आली आहे. खेळणी घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हे बीएसआय मानांकन बघुनच घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा