

पुणे : पुढारी वृत्तसेवा
देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटोने 2022 च्या पहिल्या 6 आठवड्यात चेतक नेटवर्क दुप्पट झाल्याचे जाहीर केले. या सोबतच कंपनीने घोषणा केली आहे की चेतक इलेक्ट्रिक स्कूटर आता दिल्ली, मुंबई आणि गोव्यासह देशातील 20 शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही अनोखी, ऑल-मेटल बॉडी इलेक्ट्रिक स्कूटर आता 4 ते 8 आठवड्यांच्या प्रतीक्षा कालावधीसह 20 शहरांमध्ये बुक केली जाऊ शकते. ही स्कूटर खरेदी करू इच्छिणारे ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटव रजाऊन सहजपणे ऑनलाइन बुक करू शकतात. चेतक इलेक्ट्रिक स्कूटर 2,000 रुपये भरून बुक करता येऊ शकते.
बजाज ऑटोने 2021 मध्ये चेतकचे 8 शहरांमध्ये शेवटचे बुकिंग सुरू केले. 2022 च्या पहिल्या सहा आठवड्यांमध्ये, चेतक बुकिंग 12 इतर शहरांमध्ये उघडण्यात आले यामध्ये कोईम्बतूर, मदुराई, कोची, कोझिकोड, हुबळी, विशाखापट्टणम, नाशिक, वसई, सुरत, दिल्ली, मुंबई आणि मापुसा या शहरांचा समावेश आहे. शहरांच्या यादीत दिल्ली आणि मुंबईचा समावेश केल्याने, चेतकने आता इलेक्ट्रिक वाहनांसाठी भारतातील दोन सर्वात मोठ्या बाजारपेठांमध्ये प्रवेश केला आहे. बजाज ऑटोने नुकतीच आपली इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
कंपनीच्या वेबसाइटवर सांगितल्याप्रमाणे बजाजच्या या नवीन इलेक्ट्रिक चेतकची किंमत प्रीमियम व्हेरियंटसाठी रु. 1.45 लाख एक्स-शोरूम आहे. ही नवीन चेतक अर्बन आणि प्रीमियम अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये लिथियम-आयन बॅटरी पॅक येतो, जो एका चार्जवर 95 किमी इको मोडमध्ये ची श्रेणी आणि 70 किमी प्रतितास इतका उच्च वेग देतो. बजाज चेतक इलेक्ट्रिक सुमारे 6 ते 8 तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते.