शाळेतल्या बॅकबेंचर मुलाने पटवली टॉपर; मंडपात तिला पाहून असं केलं सेलिब्रेशन

Back bencher and toppers love story video goes viral on social media
Back bencher and toppers love story video goes viral on social media
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : आपल्याकडे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये टॉपर आणि बॅकबेंचर असे दोन प्रकार असतात. टॉपर हा खूप अभ्यास करणारा तर बॅकबेंचर हा अभ्यासात रुची नसणारा असा आपल्याकडे समज आहे. त्यातही एखाद्या बॅकबेंचर मुलाला टॉपर मुलगी आवडली तर ती त्याला भाव देण्याची शक्‍यता फार कमीच. बॅकबेंचर्सबद्दल आपल्या मनात एक समज निर्माण झालेला आहे तो म्हणजे, याचं पुढे जाऊन काय होणार? आयुष्यात याला काही जमणार नाही, अशी भावना वर्गातल्या टॉपरच्या मनात असते. त्यामुळे टॉपर मुलगी आणि बॅकबेंचर मुलगा या दोघांचे सूत जुळतील आणि त्यांचे प्रेम हे विवाहापर्यंत पोहोचेल अशी शक्‍यता फार कमी असते. पण ही अशक्‍य गोष्ट एका बॅकबेंचरने शक्‍य करून दाखवली आहे. त्याने आपल्या लग्नाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.

बॅकबेंचर टॉपरच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांचे प्रेम यशस्वी होण्याची शक्‍यता जवळपास नसते. मात्र एका बॅकबेंचरचे टॉपरबरोबर लग्न करण्याचं स्वप्न साकार झाले आहे. या बॅकबेंचरने व्हिडिओ शेअर करत आपली लव्हस्टोरी थोडक्‍यात सांगितली आहे. त्यात शाळेतील ईअर एन्डचा फोटो आहे, त्यात बॅकबेंचर मुलगा शेवटी तर टॉपर मुलगी पहिल्या रांगेत बसलेली दिसत आहे. शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे या तरुणाने मुलीशी ओळख वाढवली. हळूहळू दोघे एकमेकांना भेटून डेट करू लागले. काही दिवस एकमेकांना भेटल्यानंतर दोघांनी प्रेमाची कबुली दिली आणि लग्नाचा निर्णय घेतला.

लग्नात जेव्हा मुलगी मुलाला हार घालण्यासाठी येते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. त्यांनी आनंद अगदी हटके पद्धतीने व्यक्त केला. मुलीने देखील गोड हसून त्याच्या कृतीला दाद दिली आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. हा व्हिडिओ chatieandsatie या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news