Babar Azam vs Virat Kohli : बाबरने मोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम!

Babar Azam vs Virat Kohli : बाबरने मोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Babar Azam vs Virat Kohli : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) बांगलादेशविरुद्ध 40 चेंडूत 55 धावा करत आपला चमकदार फॉर्म कायम ठेवला. या खेळीसह बाबरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा पार केला. सर्वात कमी डावात 11,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत बाबरने आशियाई फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकले आहे. या सामन्यापूर्वी बाबरच्या खात्यात एकूण 10,947 धावा होत्या. बाबरने 3122 कसोटी धावा आणि 4664 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत, तर T20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये त्याच्या खात्यात 3216 धावा आहेत.

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या टी 20 तिरंगी मालिकेत पाकिस्तानने बांगलादेशचा 7 विकेट्सने पराभव केला. पाकिस्तानकडून विकेटकीपर सलामीवीर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि बाबर आझम यांनी अर्धशतके झळकावली. या सामन्यात बाबर आझमने 40 चेंडूत 55 धावा केल्या. यादरम्यान त्याने 9 चौकार मारले. उजव्या हाताचा फलंदाज असलेल्या बाबरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11,000 धावाही पूर्ण केल्या. 27 वर्षीय बाबर आझम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा 11वा पाकिस्तानी फलंदाज ठरला. त्याच्या आधी इंझमाम-उल-हक, युनूस खान, मोहम्मद युसूफ, जावेद मियांदाद, सलीम मलिक, सईद अन्वर, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, शाहिद आफ्रिदी आणि मिसबाह-उल-हक यांनी पाकिस्तानसाठी ही कामगिरी केली आहे. (Babar Azam vs Virat Kohli)

बाबर आझमने 251 व्या डावात विक्रम केला

बाबर आझम हा सर्वात जलद 11,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा आशियाई फलंदाज ठरला आहे. यादरम्यान त्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. बाबरने 251 व्या डावात ही कामगिरी केली. विराट कोहलीने 11 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्यासाठी 261 डाव खेळले. तर माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी 262 आणि जावेद मियांदादने 266 व्या डावात 11 हजार धावांचा टप्पा पार केला होता. (Babar Azam vs Virat Kohli)

पाकिस्तान 7 विकेट्सने जिंकला

बांगलादेशने दिलेल्या 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने मोहम्मद रिझवानच्या 69 आणि बाबर आझमच्या 55 धावांच्या जोरावर 19.5 षटकांत 3 बाद 177 धावा केल्या. बांगलादेशकडून कर्णधार शकीब अल हसनने 68 आणि लिटन दासने 69 धावा केल्या. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि मोहम्मद वसीम ज्युनियरने दोन-दोन बळी घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news