बाबा महाराज सातारकर : घराण्याची १३५ वर्षांची परंपरा वेगळ्या उंचीवर नेणारे कीर्तनकार

बाबा महाराज सातारकर : घराण्याची १३५ वर्षांची परंपरा वेगळ्या उंचीवर नेणारे कीर्तनकार
Published on
Updated on

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : ज्येष्ठ कर्तनकार नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे उर्फ बाबा महाराज सातारकर यांचे आज नवी मुंबईत नेरूळमध्ये निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. उद्या संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थिवावर नेरुळमध्ये अत्यंसंस्कार होणार आहेत. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातार्‍यामध्ये झाला होता. बाबामहाराज सातारकरांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्तम मृदूंग वाजवायचे. बाबा महाराज सातारकर यांच्या घराण्याची सांप्रदाय मध्ये 135 वर्षांची परंपरा आहे. (Baba Maharaj Satarkar passes away)

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे उर्फ बाबा महाराज सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी, इ.स. १९३६ रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात, असे प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली. हरिविजय, भक्तिविजय या ग्रंथांवर ते प्रवचने करत असत. त्यांच्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र अप्पामहाराज सातारकर यांनी फडाची धुरा सांभाळली. इ.स. १९६२ साली अप्पामहाराजांचे निधन झाल्यावर अप्पामहाराजांचे पुतणे – नीळकंठ ज्ञानेश्वरांनी, अर्थात बाबामहाराज सातारकरांनी फडाची परंपरा सांभाळली.

फेब्रुवारीमध्ये पत्नीचे निधन

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर यांचे या वर्षाच्या सुरूवातीलाच फेब्रुवारी महिन्यात निधन झाले होते. नेरुळमध्ये त्यांनी वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. बाबा महाराज सातारकर यांच्या अध्यात्माच्या विचार प्रसाराच्या कार्यात त्यांनी सक्रीय योगदान दिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news