श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा : जैश-ए-मोहम्मदची धमकी; सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट

श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा : जैश-ए-मोहम्मदची धमकी; सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट
Published on
Updated on

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : निष्पाप मुस्लिमांना मारून मंदिर उभारले जात आहे, अशी गरळ ओकत पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने धमकी दिली आहे. 'जैश'च्या धमकीनंतर आधीच सतर्क असलेल्या गुप्तचर यंत्रणा आणखी सतर्क झाल्या आहेत.

येत्या सोमवारी अयोध्येत भव्य मंदिरात श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री जैश-ए-मोहम्मदने धमकी देणारे निवेदन जारी केले आहे. त्यात जैश-ए-मोहम्मदने निष्पाप मुस्लिमांना मारून मंदिर उभारले जात आहे, असे म्हटले आहे. तसेच अयोध्येतील स्थिती ही इस्रायलमधील अल-अक्सा मशिदीसारखीच असल्याचेही खोडसाळ विधान केले
आहे.

जैश-ए-मोहम्मदच्या निवेदनानंतर अयोध्येत सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट दिला आहे. गुप्तचर खात्याने म्हटले आहे की, अयोध्येत सारे काही नियंत्रणात असून, योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि प्रजासत्ताक दिनामुळे देशभर सुरक्षा यंत्रणा आधीपासूनच हाय अलर्टवर आहेत. गुप्तचर खात्याच्या म्हणण्यानुसार, जैश-ए-मोहम्मदच्या या निवेदनाला फारसा काही अर्थ नाही. 'आयएसआय'च्या हातातील कठपुतळी संघटना आहे.

मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी; एकास अटक

पोलिसांना फोन करून अयोध्येतील श्रीराम मंदिर 22 जानेवारीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी बिहारच्या अररिया येथे एका तरुणास अटक करण्यात आली आहे. महम्मद इंतखाब असे त्याचे नाव असून, तो अररिया जिल्ह्यातील कालियागंज गावचा रहिवासी आहे. त्याने 112 नंबरवर फोन करीत आपली ओळख छोटा शकील सांगत आणि आपण दाऊद टोळीत असल्याचे सांगत ही धमकी दिली होती. पोलिसांनी गांभीर्य ओळखत सदर नंबर ट्रेस केला व कालियागंजकडे पोलिस पथके पाठवत महम्मद इंतखाबच्या मुसक्या आवळल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news