

राधानगरी ; पुढारी वृत्तसेवा संपूर्ण जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने धरण पूर्ण संचय क्षमतेने भरले आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने थोडीशी उघडीप दिल्याने धरणाची पाणी पातळी स्थिर होती. आज (बुधवार) पहाटे पावसाचा जोर वाढल्याने पहाटे ५.३० वा. धरणाचा सहा नंबरचा दरवाजा उघडला होता. दरम्यान सकाळी ८.५५ वाजता धरणाचा दुसरा स्वयंचलित दरवाजाही खुला झाला. या दोन दरवाजातून २८५६ क्युसेक्स व धरणातून खासगी वीजनिर्मितीसाठी १६०० क्यूसेक्स असा एकूण ४४५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे.
धरणात पाणी पातळी ३४७.४० फूट इतकी झाली आहे. 347.50 फूट पाणी पातळीला धरण पूर्ण क्षमतेने भरते. पावसाचा जोर वाढल्यास धरणाचे आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता असून, नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपअभियंता प्रवीण पारकर यांनी केले आहे.
धरणातील पाण्याचा विसर्ग 1428 तर पॉवर हाऊसमधून 1600 क्यूसेक्स असा एकूण 3028 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली.
संपूर्ण जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने धरण पूर्ण संचय क्षमतेने भरले आहे.मंगळवारी दिवसभर पावसाने थोडीशी उघडीप दिल्याने धरणाची पाणी पातळी स्थिर होती. आज पहाटे जोर वाढल्याने पहाटे ५.३० वा. धरणाचा सहा नंबरचा एक स्वयंचलित दरवाजा खुला झाला आहे. या दरवाजातून १४२८ व धरणातून खासगी वीजनिर्मितीसाठी १६०० क्यूसेक्स असा एकूण ३०२८ क्युसेका पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे. धरणात पाणी पातळी ३४७.४० फूट इतकी झाली आहे. 347.50 फूट पाणी पातळीला धरण पूर्ण क्षमतेने भरते.पावसाचा जोर धरणाचे आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपअभियंता प्रवीण पारकर यांनी केले आहे.
हेही वाचा :