गजानन लोंढे
गजानन लोंढे हे दैनिक पुढारी या वृत्तपत्राचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आहेत. त्यांनी राज्यशास्त्रात पदवीत्तर आणि कृषीमध्ये पदविका मिळविली आहे. ते गेल्या पंधरा वर्षापासून प्रिंट माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. ते सध्या समाजकारण, राजकारण आणि शेती अशा विविध विषयावर लेखण करतात. त्यांना पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल अनेक संस्थांच्या वतीने गौरविण्यात आले आहे. जिल्हा मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा उदयनोमुख पुरस्कार, सेवा सदन व साथ फाऊंडेशनचा सामाजिक पुरस्कार अशा काही पुरस्कारांचा यात समावेश आहे.