

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टीव्ह स्मिथने डब्ल्यूटीसी फायनल (WTC Final 2023) मध्ये शतक झळकावून रिकी पाँटिंगला मागे टाकले. तो आता भारताविरुद्ध सर्वाधिक शतके फटकावणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज बनला आहे. विशेष म्हणजे स्मिथने भारताचे सुनील गावस्कर आणि विराट कोहलीलाही मागे टाकले आहे.
डब्ल्यूटीसी फायनलच्या दुस-या दिवशी स्मिथने शतक पूर्ण केले. पहिल्या दिवसाअखेर तो नाबाद 95 धावांवर खेळत होता. गुरुवारी सामन्याच्या दुस-या दिवशीच्या पहिल्या सत्रातील पहिले षटक टाकण्यासाठी सिराजच्या हाती चेंडू सोपवण्यात आला. पण या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर स्मिथने चौकार मारून आपली धावसंख्या 99 पर्यंत पोहोचवली. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर आणखी एक चौकार मारून त्याने 229 चेंडूत शतकाला गवसणी घातली. स्मिथचे कसोटी क्रिकेटमधील हे 31 वे शतक आहे.
स्मिथने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टींगला मागे टाकले आहे. पॉन्टींगने भारताविरुद्ध 8 कसोटी शतके झळकावली आहेत. आता स्मिथने भारताविरुद्धचे 9वे कसोटी शतक झळकावून त्याला मागे टाकले आहे. विक्रमाच्या यादीत त्याने सुनील गावस्कर, विराट कोहली यांनाही मागे टाकले.
विक्रमाच्या यादीत त्याने सुनील गावस्कर, विराट कोहली यांनाही मागे टाकले. भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 9 शतके झळकावली आहेत, तर सुनील गावस्कर, विराट कोहली यांची 8-8 शतके आहेत. आता फक्त सचिन तेंडुलकर स्मिथच्या पुढे आहे, ज्याची 11 शतके आहेत.
9 – जो रूट
9- स्टीव्ह स्मिथ
8- रिकी पाँटिंग
8- विव्ह रिचर्ड्स
8- गॅरी सोबर्स
41 – रिकी पाँटिंग
32 – स्टीव्ह वॉ
31 – स्टीव्ह स्मिथ
30 – मॅथ्यू हेडन
29 – सर डॉन ब्रॅडमन
11- सर डॉन ब्रॅडमन
7- स्टीव्ह वॉ
7- स्टीव्ह स्मिथ
6- राहुल द्रविड
6- गॉर्डन ग्रीनिज
4- डॉन ब्रॅडमन, हेडिंग्ले
3- डॉन ब्रॅडमन, ट्रेंट ब्रिज
3- गॉर्डन ग्रीनिज, ओल्ड ट्रॅफर्ड
3- ब्रुस मिशेल, ओव्हल
3- स्टीव्ह स्मिथ, ओव्हल
3- दिलीप वेंगसरकर, लॉर्ड्स