Shahrukh Khan-Atlee : एटलीने भर कार्यक्रमात शाहरुखचे धरले पाय अन् किसही (Video)

शाहरुख-एटली
शाहरुख-एटली
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख-साऊथ अभिनेत्री नयनताराला घेऊन साऊथ दिग्दर्शक एटलीने जवान चित्रपट बनवला. (Shahrukh Khan-Atlee ) सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटाची खूप प्रशंसा देखील झाली. आता पुन्हा एकदा शाहरुख आणि एटलीची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण आहे, भर कार्यक्रमातील एक व्हिडिओ. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एटली शाहरुखचे पाय धरताना दिसत आहे. (Shahrukh Khan-Atlee )

नेमकं काय घडलं?

एका कार्यक्रमात विजेत्याच्या नावाची घोषणा होताच सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. त्यावेळी तमिळ दिग्दर्शक आपले नाव ऐकून एटली हात जोडून उभा राहतो. नंतर शाहरुख खान बसलेल्या ठिकाणी जातो. तो शाहरुख खानला जोरदार मिठी मारतो आणि किसही करतो. ही क्लिप इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. किंग खानच्या प्रती दिग्दर्शकाचा हा व्यवहार फॅन्सना खूप आवडला. तर काही लोकांनी हेदेखील प्रश्न उपस्थित केले की, पाय धरण्याची काय गरज होती?

एकाने म्हटले की, हा दिग्दर्शकाचा मोठेपणा आहे. एका अन्य नेटकऱ्याने म्हटले की, वृद्धाचे चरणस्पर्श तर केलेच पाहिजे. अनेक लोकांनी त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असल्याचे म्हटले. तर काहींनी प्रश्न उपस्थित केले की, पाय धरण्याची काय गरज होती. शाहरुखला आमच्या साऊथ डायरेक्टरकडे यायला हवे. काही लोकांनी पुरस्कार मिळाल्यानंतर म्हटले की, किती फालतू चित्रपट होता, मी तर २० मिनिटे देखील सहन करू शकलो नाही.

video- Manav Manglani Instagram वरून साभार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news