Atiq Ahmed Shot Dead : अतिक-अशरफ हत्याप्रकरणी 17 पोलिसांचे निलंबन

उत्तर प्रदेशमधील कुख्‍यात गँगस्‍टर अतिक अहमद आणि त्‍याचा भाऊ अश्रफ अहमद. ( संग्रहित छायाचित्र )
उत्तर प्रदेशमधील कुख्‍यात गँगस्‍टर अतिक अहमद आणि त्‍याचा भाऊ अश्रफ अहमद. ( संग्रहित छायाचित्र )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Atiq Ahmed Shot Dead : प्रयागराजमध्ये माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येप्रकरणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी कारवाई करत 17 पोलिसांचे निलंबन केले आहे. हे सर्व पोलीस अतिक अहमदच्या सुरक्षेत तैनात होते. सीएम योगी यांनी हत्येच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कारवाई

अतिक अहमदची हत्या झाल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. यासाठी तीन सदस्यीय न्यायिक आयोग स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक

विशेष डीजी एलओ प्रशांत कुमार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. डीजीपी आरके विश्वकर्मा, विशेष डीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार, प्रधान सचिव गृह संजय प्रसाद आणि इतर अधिकारीही उपस्थित होते.

सीमा सील, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवली

प्रयागराजच्या सीमा सील करताना सुरक्षेच्या कारणास्तव कलम 144 लागू करण्यात आले आहे. संवेदनशील भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. जवळपासच्या जिल्ह्यांतून पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. सीएम योगी यांनी यूपीच्या 75 जिल्ह्यांच्या डीएम आणि एसपींना सतर्क केले आहे. शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. (Atiq Ahmed shot dead)

हल्लेखोरांची चौकशी सुरू

पोलिसांनी घटनास्थळावरून तीन हल्लेखोरांना अटक केली आहे. त्यांची नावे लवलेश, सनी, अरुण मौर्य अशी सांगण्यात येत आहेत. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news