

कोगनोळी; विठ्ठल कोळेकर : चिकोडी तालुक्यातील छोटे गाव असलेल्या एकसंब्यातील दिग्गज राजकारण्यांनी गावाची वेगळी ओळख निर्माण करत जिल्ह्यात वरचष्मा कायम ठेवला आहे.
आताच्या विधानसभा निवडणुकीत चिकोडी सदलगा – मतदारसंघातून काँग्रेसचे गणेश हुक्केरी तर निपाणी मतदारसंघातून भाजपच्या शशिकला जोल्ले विजयी होऊन पुन्हा एकदा एकसंबा गावात तीन आमदार व एक खासदार अशी ओळख निर्माण केली आहे. माजी मंत्री व वायव्य शिक्षक मतदारसंघाचे आ. प्रकाश हुक्केरी हे विधान परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे चिरंजीव गणेश हुक्केरी आताच्या निवडणुकीमध्ये विक्रमी मतांनी निवडून आले.