.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अष्टविनायकांपैकी (Ashtavinayak Darshan) पाली येथील हे मंदिर बल्लाळेश्वर (Pali Shri Ballaleshwar) या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले एकमेव मंदिर आहे. मूळ मंदिर लाकडी होते. त्याचा जीर्णोद्धार करून सध्याचे दगडी मंदिर बांधलेले आहे. एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे.
मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी आहे. मूर्तीचे डोळे आणि बेंबी हिरेजडीत आहे. हिवाळ्यात दक्षिणायनात सूर्योदयावेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. साधारणतः गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. परंतु बल्लाळेश्वराच्या मंदिराची (Pali Shri Ballaleshwar) ही खासियत आहे की, इथे गणपतीला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो. बल्लाळेश्वर देवस्थान रायगड जिल्ह्यात रोहा या ठिकाणाहून २८ किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर अंबा नदी आणि प्रसिद्ध सरसगड किल्ला यांच्या मध्ये स्थित आहे. पुण्यापासून बल्लाळेश्वर मंदिराचे अंतर २०० किलोमीटर आहे.