

अष्टविनायकांपैकी दूसरा गणपती हा सिध्दटेकचा सिध्दिविनायक. या मंदिरातील मूर्ती ही स्वयंभू आहे. ती तीन फूट उंच आहे. मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड उजवीकडे आहे. गणपतीचे पोट जास्त मोठे नसून मांडीवर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. गणपतीच्या दोन्ही बाजूला जय-विजय यांच्या पितळेच्या मूर्ती आहेत.
गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे. या मंदिरात गणेशचतुर्थी आणि गणेश जयंती हे उत्सव साजरे केले जातात. या सणांना सलग तीन दिवस गणपतीची पालखी निघते. सोमवती अमावास्या साजरी केली जाते. विजयादशमीला येथे जत्रा भरते. हे मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या गावापासून ४८ किलोमीटर अंतरावर आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर भीमा नदीच्या काठावर सिद्धटेक येथे हे मंदिर आहे. तेथे पोहोचण्यासाठी चौफुला-पाटस मार्गे प्रवास करावा लागतो.