

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीची नुकतीच घोषणा झाली. यानंतर आपसह अनेक पक्ष उमेदवार जाहीर करण्यात आणि निवडणूक प्रचाराचे नियोजन करण्यात व्यस्त असतानाच मुख्यमंत्री केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक झाली. त्यामुळे हा पक्ष आणि पक्षाच्या नेतृत्त्वाला मोठा धक्का मानला जात आहे. दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर पक्षासह देशभरात संतप्ततेची लाट पसरली आहे. (Arvind Kejriwal)
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी हायकोर्टाने केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर ईडीचे पथक गुरुवारी (दि.२१) संध्याकाळी उशिरा अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. सुमारे २ तासांच्या छाप्या आणि चौकशीनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तपास यंत्रणेने अटक केली. केजरीवालांच्या अटकेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. आप नेते आणि कार्यकर्ते देखील आक्रमक झाले असून, त्यांनी केंद्र सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Arvind Kejriwal)
"देशात प्रथमच एका विद्यमान मुख्यमंत्र्याला अटक करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांना Z+ सुरक्षा कवच आहे. आता ते केंद्र सरकारच्या ईडीच्या ताब्यात आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत आम्हाला काळजी आहे. असे मत मंत्री अतिशी यांनी एक्स पोस्ट करत सरकारवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
"तुम्ही अरविंद केजरीवाल यांना अटक कराल पण त्यांच्या विचाराला तुम्ही कसे कैद कराल. अरविंद केजरीवाल ही एक व्यक्ती नसून, तो एक विचार आहे आणि आम्ही आमच्या नेत्याच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत…,इनक्लाब जिंदाबाद" अशी पोस्ट पंजाबचे मुख्यमंत्री आणि आप नेते भगवंत मान यांनी X वर केली आहे.
'केजरीवाल' हे केवळ एका व्यक्तीचे नाव नाही तर ते एका विचाराचे नाव आहे. तुम्ही केजरीवाल यांच्या शरीराला अटक कराल, पण त्यांच्या विचारांना अटक करू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया आप नेते खासदार राघव चड्डा यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की 'आप'ने भाजपच्या मुख्यालयाबाहेर १० वाजता आंदोलन करण्याची घोषणा केली. यामुळे आप कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येईल. पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, कालची परिस्थिती लक्षात घेता, ईडी मुख्यालय आणि भाजप मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने आपचे कार्यकर्ते पोहोचण्याची शक्यता कमी आहे.
हेही वाचा: