चेहरा नव्हे, छाती बघून एआय सांगेल तुमचे अचूक वय!

चेहरा नव्हे, छाती बघून एआय सांगेल तुमचे अचूक वय!
Published on
Updated on

नवी दिल्ली; जाल खंबाटा : चेहर्‍याकडे नव्हे तर आपल्या छातीकडे पाहून आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) नेमके वय किती आहे हे सांगू शकेल, असे म्हटले तर प्रथम ती कवी कल्पना वाटेल. पण, प्रत्यक्षातच अशी चौफेर प्रगती होत असून ओसाका मेट्रोपॉलिटन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी असे आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजेन्स मॉडेल तयार केले आहे, जे चेहर्‍याकडे नव्हे तर आपल्या छातीकडे पाहून वय किती हे बिनचूकपणे सांगू शकेल!

आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे हे नवे अत्याधुनिक, सुसज्ज मॉडेल एखाद्या व्यक्तीचे कालक्रमानुसार वय किती असेल, छातीचा रेडिओग्राफ पाहून अचूक वर्तवेल, अशी याची रचना आहे. या एआय मॉडेलचे अनोखे वैशिष्ट्य असे की, असमानता आढळून आली तर हे मॉडेल जुनाट आजाराशी संबंध आहे का, हे देखील सुस्पष्ट करणार आहे. या अनोख्या वैशिष्ट्यामुळे आजाराचे लवकर निदान होणे आणि त्यावर सत्वर उपचार सुरू करता येणे शक्य असल्याने वैद्यकीय क्षेत्रात यामुळे मोठी झेप घेता येऊ शकेल, असे प्राथमिक चित्र आहे. मेट्रो पॉलिटन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा याबाबतचा अहवाल लवकरच 'लॅन्सेट हेल्थी लाँगेव्हिटी'मध्ये प्रकाशित होणार आहेत.

ओसाका विद्यापीठातील डायग्नॉस्टिक अँड इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी विभागाच्या यासुहितो मित्सुयामा व डॉ. दैजू युएदा यांच्या नेतृत्वाखालील पदवीधर विद्यार्थ्यांच्या संशोधन पथकाने सर्वप्रथम निरोगी व्यक्तीचे छातीच्या रेडिओग्राफ माध्यमातून अचूक वयाचा अंदाज लावू शकेल, असे डीप लर्निंग बेस एआय मॉडेल तयार केले आणि त्यानंतर त्यांनी पेशंटस्च्या रेडिओग्राफवरून एआयने वर्तवलेले वय आणि प्रत्येक आजार यातील संबंधातील विश्लेषण करण्यासाठी या मॉडेलमध्ये व्यापक सुधारणा केल्या. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे मॉडेल सिंगल डाटासेटवरील असल्याने केवळ त्याच्यावरच अवलंबून राहणे गैर ठरत असल्याने संशोधकांनी विविध इन्स्टिट्यूटकडून डाटा गोळा करत त्यावर संशोधनावर भर दिला.

छातीच्या रेडिओग्राफचा बायोमेकर म्हणून वापर करत एआयने वर्तवलेल्या वयाची कितपत खात्री देता येईल, याची खातरजमा करण्यासाठी अन्य दोन इन्स्टिट्यूटकडून 34 हजार 197 पेशंटकडून आणखी 34 हजार 197 छातीचे रेडिओग्राफ घेण्यात आले आणि त्याची तुलना करण्यात आली. यातून असे निष्पन्न झाले की, एआय मॉडेलने वर्तवलेले वय आणि पेशंटचे कालक्रमानुसार वय यात अपेक्षेपेक्षा अधिक समानता होती. शिवाय उच्च रक्तदाब, युरिक अ‍ॅसिड व फुफ्फुसाच्या रोगाचा अंदाज वर्तवण्यात एआय मॉडेल सरस ठरले.

13 वर्षांत 36 हजारपेक्षा अधिक लोकांवर संशोधन

एआय मॉडेलने वयाचा अंदाज वर्तवण्याच्या या प्रक्रियेत विकास, प्रशिक्षण, अंतर्गत व बहिर्गत चाचण्या यासाठी 2008 ते 2021 या कालावधीत 36 हजार 51 निरोगी व्यक्तींकडून 67 हजार 99 छातीचे रेडिओग्राफ एकत्रित केले गेले. या सर्व व्यक्तींची यासाठी 3 चाचणी केंद्रांवर आरोग्य चिकित्सा केली गेली. विकसित केलेल्या मॉडेलने एआय इस्टिमेटेड वय आणि क्रोनोलॉजिकल वय यातील सहसंबंध गुणांक 0.95 इतके असल्याचे दाखवले. एरवी हे प्रमाण 0.9 किंवा त्याहून अधिक असेल तर अधिक मजबूत मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news