Arshdeep Singh : अर्शदीपच्या ‘भेदक’ गोलंदाजीमुळे ‘बीसीसीआय’चे लाखो रुपयांचे नुकसान!

Arshdeep Singh
Arshdeep Singh
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल ) स्‍पर्धेत शनिवारी ( दि. २२)  पंजाब किंग्‍जच्‍या संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात भेदक गोलंदाजी केली. अर्शदीपच्या भेदक गोलंदाजीचा आर्थिक फटका भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय ) बसला आहे. जाणून घेवूया अर्शदीपमुळे बीसीसीआयचे झालेल्‍या आथिंक नुकसानाविषयी…

नाणेफेक जिंकत मुंबईने नाणेफेक जिंकत पंजाबला फलंदाजीचे निमंत्रण दिले होते. शिखर धवनच्या अनुपस्थिती आणि अष्टपैलु सॅम करणच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने मुंबई समोर २१५ धावांचे बलाढ्य आव्हान ठेवले होते.  सॅम करणने कर्णधाराची जबाबदारी पार पाडत २९ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. यासह हरप्रित सिंग भाटीया २८ चेंडूत ४१ तर प्रभासिमरन सिंग १७ चेंडूत २६, अथर्व तायडे १७ चेंडूत २९ आणि जितेश शर्मा याने ७ चेंडूत २५ धावांचे योगदान दिले. पंजाबच्‍या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरशा: पिसे काढली. जोफ्रा आर्चर, जेसन बेहरनड्रॉफ, कॅमरुन ग्रीन या अनुभवी गोलंदाजांसह अर्जुन तेंडूलकर सारख्या नवख्या गोलंदाजांना धूवून काढले. (Arshdeep Singh)

पंजाबच्या २१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ २०१ धावांपर्यंतच मजल मारु शकला. (Arshdeep Singh) मुंबईकडून कॅमरन ग्रीनने ४३ चेंडूमध्ये ६७, सुर्यकुमार यादव २६ चेंडूमध्ये ५७ तर कर्णधार रोहित शर्माने २७ चेंडूमध्ये ४४ धावांचे योगदान दिले. तर

अखेरच्‍या षटकात अर्शदीपची कमाल (Arshdeep Singh)

अर्शदीपने अखेरच्‍या षटकात उत्‍कृष्‍ट गोलंदाजीचे प्रदर्शन केलेच त्‍याचबरोबर दोनवेा स्टंप्सही तोडल्‍या. डावखुऱ्या अर्शदीपने सामन्याच्या शेवटच्या षटकात एकदा नाही तर दोनदा मिडल स्टंप तोडली. अर्शदीपने प्रथम तिलक वर्माचा त्रिफळा उडवला तर यानंतर नेहाल वढेरालाही अशाच पद्धतीने तंबूत पाठवले. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधील एका स्टंप सेटची किंमत २५ ते ३० लाख रुपयांच्या दरम्यान असते. अर्शदीपने सलग दोन वेळा स्‍टंप तोडल्‍यामुळे बीसीसीआयला सुमारे ३० लाख रुपयांचा फटका बसला आहे. पंजाब कडून अर्शदीप सिंगने ४ षटकांमध्ये २९ धावा देत ४ विकेट्स पटकावल्या. शिवाय लिवम लिविंगस्टोन आणि नेथन इलिसने प्रत्येकी १ विकेट पटकावली. कर्णधार सॅम करणचे दमदार अर्धशतक आणि अर्शदीप सिंगच्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सवर १३ धावांनी विजय मिळवला.

'बीसीसीआय'ला मोठा आर्थिक फटका

मीडीया रिपोर्टसनुसार, आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधील एका स्टंप सेटची किंमत २५ ते ३० लाख रुपयांच्या दरम्यान असते. एका सेटमध्ये तीन स्टंप्स असतात. याशिवाय स्टंप्सच्या वरती लावण्यात येणाऱ्या एका बेल्सची किंमत ५० हजार इतकी आहे. आयपीएलमध्ये एका सामन्यात स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकरवर वापरल्या जाणाऱ्या दोन स्टंप्सचे सेट वापरले जातात. एका स्टंप सेटची किंमत २५ लाख इतकी आहे. तर दोन्ही बाजूला वापरण्यात येणाऱ्या स्टंप सेटची किंमत ५० लाख इतकी आहे.दोन्ही बाजूला वापरण्यात येणाऱ्या बेल्सची किंमत १ लाख इतकी आहे.अर्शदीपने सलग दोन वेळा स्‍टंप तोडल्‍यामुळे बीसीसीआयला सुमारे २४ लाख रुपयांचा फटका बसला आहे.  (Arshdeep Singh)

LED स्‍टम्‍प आणि बेल्‍सची एवढी किंमत कशी ?

आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये वन-डे आणि टी-20मध्‍ये अशा प्रकारचे स्‍टम्‍स आणि बेल्‍सचा वापर होतो. यामध्‍ये असणार्‍या एलईडी आणि सेन्सिटिव्हिटी मीटर्स या बेल्‍सच्या अत्‍यंत बारीक हालचालीवर लक्ष ठेवतात. यामुळे हे स्टंपच्या सामान्य स्‍टम्‍पपेक्षा महाग असतात. २०१४ च्‍या टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत सर्वप्रथम LED स्टंप आणि झिंग बेल्स पहिल्यांदा वापरण्यात आल्या होत्या. तेव्हापासून आंतरराष्‍ट्रीय वन-डे अणि टी-20मध्‍ये अशा प्रकारच्‍या स्‍टम्‍प आणि बेल्‍सचा वापर होत आहे.

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news