Ankita Bhandari Murder Case : गरीब असले तरी 10,000 रुपयांसाठी स्वतःला विकणार नाही, अंकिताचा तिच्या फ्रेंडसोबतचे चॅटमधील माहिती

Ankita Bhandari Murder Case : गरीब असले तरी 10,000 रुपयांसाठी स्वतःला विकणार नाही, अंकिताचा तिच्या फ्रेंडसोबतचे चॅटमधील माहिती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Ankita Bhandari Murder Case अंकिता भंडारी खून प्रकरणात आणखी नवीन माहिती समोर आली आहे. मृत्यू पूर्वी अंकिताने आपल्या फ्रेंडला व्हॉट्स अॅप वरून नोकरीच्या ठिकाणी होणा-या त्रासाबद्दल माहिती दिली होती. तीने रिसॉर्टमध्ये आपल्याला मालकांकडून ग्राहकांसोबत संबंध प्रस्थापित करायला भाग पाडले जात आहे, अशी व्यथा बोलून दाखवली होती.

Ankita Bhandari Murder Case अंकिता भंडारी ही उत्तराखंडच्या पौड गढवाल येथील वनांतर रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्टचा जॉब करत होती. ती 18 सप्टेंबरला अचानक गायब झाली. घटनेच्या तीन दिवसानंतर पोलिसांनी याप्रकणी रिसॉर्टचा मालक पुलकित आर्या आणि त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेतले. पुलकित आर्या हा भाजप नेता विनोद आर्या यांचा मुलगा आहे. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर आर्या ने तिला चिल्ला कॅनॉलमध्ये ढकलून दिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अंकिताचा मृतदेह शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, अंकितावर ग्राहकांशी संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला जात होता. मात्र, तिने नकार दिला आणि आपण हे सर्वांना सांगू, असे पुलकितला सांगितले. त्यामुळे त्याने तिला कॅनॉलमध्ये ढकलून दिल्याचे कबूल केले. तिचा मृतदेह काल सकाळी चिल्ला कॅनॉलमधून बाहेर काढण्यात आला.

आज या प्रकरणातील नवीन माहिती उजेडात आली आहे. अंकिताने तिच्या एका जवळच्या फ्रेंडला सांगितले होते की, ती ज्या रिसॉर्टमध्ये काम करते त्या रिसॉर्टचे मालक आणि व्यवस्थापक तिच्यावर ग्राहकांना 'विशेष सेवा' देण्यासाठी दबाव आणत होते. तिने व्हॉट्सअॅपवर तिच्या मैत्रिणीला सांगितले की ती गरीब असली तरी ती 10,000 रुपयांसाठी स्वत:ला विकणार नाही.

Ankita Bhandari Murder Case तसेच या प्रकरणी आणखी एक माहिती उघड झाली आहे. अंकिताने घटनेपूर्वी शेवटचा फोन रिसॉर्टच्या शेफला केला होता. त्यात ती रडत-रडत त्याला सांगत होती की प्लिज माझी बॅग घेऊन या. यावेळी शेफने विचारले देखिल होते की मॅडम काय झाले का रडत आहात. मात्र त्याच वेळी बॅग्राउंडमध्ये आर्याचा देखिल आवाज आला तो म्हणाला चल रे गाडी फिरव नंतर कॉल कट झाला.

दरम्यान, मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यात पाण्यात बुडाल्याने तिच्या मेंदूला ट्रॉमा होऊन तिचा त्यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी आरोपीने मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला असून या घटनेचा ऑडिओ रेकॉर्डिंग करण्यात आला आहे.

Ankita Bhandari Murder Case घटनेनंतर परिसरात प्रचंड जन आक्रोश झाला आहे. संतप्त जमावाने अंकिताला न्याय मिळाला पाहिजे अशा घोषणा देत रिसॉर्टला आग लावली. तसेच भाजप नेत्यांच्या गाडीच्या काचा देखिल फोडण्यात आल्या आहेत. आरोपींना कोर्टात नेत असताना जमावाने पोलिसांची गाडी रोखून आरोपींना मारहाण केली. घटनेनंतर भाजपने पुलकित आर्याचे वडील भाजप नेता विनोद आर्या आणि भाऊ अंकित आर्या यांना तात्काळ प्रभावातून भाजपमधून काढून टाकण्यात आले आहे. दरम्यान, न्यायालयाने पुलकित आणि त्याच्या दोन्ही साथीदारांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. केसच्या अधिक चौकशीसाठी डीआयजी पी आर देवी यांच्या अंतर्गत एसआयटी नेमण्यात आली आहे.

देवी यांनी मीडियाला माहिती दिली आम्ही रिसॉर्टच्या प्रत्येक कर्मचा-याचे स्टेटमेंट घेणार आहोत. तसेच रिसॉर्टचे पूर्ण परीक्षण करण्यात येणार आहे. आम्हाला अद्याप मृतदेहाचा अहवाल मिळालेला नाही.

हे ही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news