Andhra Pradesh Assembly Election : आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची ३८ उमेदवारांची यादी जाहीर

Andhra Pradesh Assembly Election : आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची ३८ उमेदवारांची यादी जाहीर
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Andhra Pradesh Assembly Election : काँग्रेसने आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (२२ एप्रिल ) ३८ उमेदवारांची यादी जाहीर केली. लोकसभा निवडणूकीबरोबरच १३ मे २०२४ रोजी आंध्रप्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आंध्रप्रदेशातील एकूण १७५ जागांवर विधानसभेची निवडणूक होईल. त्यासाठी काँग्रेसने ही ३८ उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीमध्ये तब्बल १० ठिकाणचे उमेदवार बदलून नवे उमेदवार देण्यात आले आहेत.

काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत आंध्रप्रदेशातील महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सुंकारा पद्मश्री यांना विजयवाडा पूर्वमधून तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लक्काराजू रामाराव यांना विशाखापट्टणम उत्तर विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. (Andhra Pradesh Assembly Election)

दरम्यान काँग्रेसने लोकसभेसाठी रविवारी आंध्रप्रदेशातील ११ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर आता ही विधानसभेच्या ३८ उमेदवारांची यादी जाहीर झाली.

काँग्रेसच्या विधानसभा उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे : (Andhra Pradesh Assembly Election)

श्रीकाकुलम : अंबाती कृष्णराव (नागभूषण राव यांच्या जागी)
बोबिली : मारिपी विद्यासागर
गजपथीनगरम : डोला श्रीनिवास (गडापू कुर्मिनायडूच्या जागी)
नेल्लीमारला : सारगडा रमेश कुमार
विशाखापट्टणम उत्तर : लक्काराजू रामाराव
चोदावरम : जगथ श्रीनिवास
एलामंचिली : नरसिंग राव
गन्नावरम : कोंडेती चिट्टीबाबू
अचंता : नेक्कंति व्यंकट सत्यनारायण
विजयवाडा पूर्व : सुंकारा पद्मश्री
जगग्यपेटा : कर्नाटी आप्पाराव
ताडीकोंडा : मनिचला सुशील राजा (चिलाका विजय कुमारच्या जागी)
रेपल्ले : मोपीदेवी श्रीनिवास राव
तेनाली : एसके बशीद
गुंटूर पश्चिम : डॉ. राजचकोंडा जॉन बाबू
चिराळा : अमांची कृष्ण मोहन
ओंगोले : तुरकपल्ली नागलक्ष्मी (बुट्टी रमेश बाबूच्या जागी)
कानिगिरी : देवरापल्ली सुब्बारेड्डी (कु. कादिरी भवानीच्या जागी)
कोवूर : पोदालकुरी कल्याण नरपारेड्डी किरणकुमार रेड्डी (नेब्राम्बका मोहनच्या जागी)
सर्वपल्ली : पी.व्ही. श्रीकांत रेड्डी (पूला चंद्रशेखरच्या जागी)
गुडूर : डॉ. यू. रामकृष्ण राव (वेमय्या चिल्लाकुरीच्या जागी)
सुल्लुरपेटा : चंदनमुडी शिवा (गाडी टिळक बाबूच्या जागी)
व्यंकटगिरी : पंता श्रीनिवासुलु
कडपा : तुम्मान कल्याल अस्जल अलीखान
पुलिवेंदला : मुलाम रेड्डी ध्रुव कुमार रेड्डी
जमलामादुगु : ब्रह्मानंद रेड्डी पामुला
उत्पादन : शेख पूल मोहम्मद नझीर
मायदुकुर : गुंडलकुंता श्रीरामुलू
अल्लगड्डा : बारागोडला हुसेन
श्रीशैलम : असर सय्यद इस्माईल
बनगनपल्ले : गुतम पुल्लैया
ढोणे : गरलापती मधुलेती स्वामी
अदोनी : गोल्ला रमेश
अलूर : नवीन किशोर अरकतला
कल्याणदुर्ग : पी. रामभूपाल रेड्डी
हिंदुपूर : मोहम्मद हुसेन इनायथुल्ला
धर्मावरम् : रंगणा अस्वर्ध नारायणा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news