अँडीज प्लेन क्रॅश : विमान ३८ हजार फूट खोल दरीत कोसळले; २९ प्रवाशांचा मृत्‍यू, बचावलेल्‍या लोकांनी जगण्यासाठी सहकार्यांच्या मृतदेहाचे तुकडे खाल्‍ले अन् ७२ दिवसांनी…

अँडीज प्लेन क्रॅश : विमान ३८ हजार फूट खोल दरीत कोसळले; २९ प्रवाशांचा मृत्‍यू, बचावलेल्‍या लोकांनी जगण्यासाठी सहकार्यांच्या मृतदेहाचे तुकडे खाल्‍ले अन् ७२ दिवसांनी…
Published on
Updated on

कॅलिफोर्निया : आपण नेहमीच पाहतो अ‍ॅडव्हेंचर चित्रपटात आपला जीव वाचवण्यासाठी अनेक जण आपल्या मित्राला मारून खातात. मात्र, हे खरेच माणसाच्या आयुष्यात घडत असेल तर हे किळसवाणेच वाटेल; पण हे खरे आहे. 13 ऑक्टोबर 1972 मध्ये अशा प्रकारची घटना घडली होती.त्यावेळी अनेक लोकांना आपले प्राण वाचवण्यासाठी मृत झालेल्या मित्रांच्या मृतदेहाचे तुकडे खाल्ले होते. या घटनेला अँडीज प्लेन क्रॅश म्हणून ओळखले जाते. ही दुर्घटना इतकी भयावह होती की 50 वर्षांनंतही या घटनेच्या स्मृती जागवल्या तर अनेकांचा थरकाप उडतो.

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या सहकार्‍यांच्या मृतदेहाच्या मासांचे तुकडे खाल्याबद्दल आपणास काहीच पश्चात्ताप होत नसल्याचे या विमान अपघातातील बचावलेल्या लोकांचे म्हणणे आहे. उरुग्वे हवाई दलाचे विमान-571 एका रग्बी टीमसह मित्र आणि कुटुंबीयांना घेऊन चिलीला रवाना झाले होते. अँडीज पर्वतादरम्यान हे विमान आले असता ते क्रॅश झाले.खराब हवामानामुळे हे विमान 38 हजार फूट खोल दरीत कोसळले. यामध्ये 29 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर 13 जण हिमस्खलनामुळे मारले गेले होते. बचावलेल्या लोकांसाठी 72 दिवस शोधमोहीम सुरू होती.

आजही या घटनेच्या आठवणी काढल्या जातात, कारण उणे 72 अंश सेल्सिअस तापमानातही काही लोकांनी आपले प्राण वाचवले होते. यावेळी खाण्या-पिण्याच्या व्यवस्थेसाठी त्यांनी कामे वाटून घेतली होती. वितळलेल्या बर्फातून पाणी मिळत होते तर अन्नासाठी त्यांना आपल्या सहकार्‍यांच्या मृतदेहाचे तुकडे खाण्याशिवाय पर्याय नव्हता. वातावरण चांगले झाल्यानंतर काही महिन्यांनी बचाव पथक आले आणि बचावलेल्या लोकांना घेऊन गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news