

बावडा : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्हात माळशिरस तालुक्यात वटपळी गावा नजीक बावडा (ता. इंदापूर) येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीस गेलेल्या एस. टी.ची टेम्पोस पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला झाला तर अन्य एक शिक्षक जखमी झाला. बाळकृष्ण हरिभाऊ काळे (रा. रेडणी) असे मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकाचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी (दि.21) पहाटे 6 वा. घडला. सुदैवाने अपघातामध्ये विद्यार्थ्यांना इजा झाली नाही. बावडा विद्यालयाची शैक्षणिक सहल कोकणात गेली होती. तेथून परतत असताना एस टी बसला( एम.एच. 14 बी. टी. 4701) हा दुर्दैवी अपघात झाला.