

पुढारी ऑनलाईन : कारगिल, लडाखला आज सकाळी ७.३८ वाजता भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ एवढी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, आज सकाळी ७.३८ वाजता कारगिल, लडाखच्या ४०१ किमी उत्तरेस ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपाचा १५० किमी खोलवर केंद्रबिंदू आहे.
यापूर्वी १८ जून रोजी लडाखमध्ये २४ तासांत तीन भूकंपाचे धक्के बसले होते. १८ जून रोजी लडाखच्या लेह जिल्ह्याच्या ईशान्येस २७९ किलोमीटर अंतरावर ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्याआधी १७ जून रोजी लडाखमध्ये ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता.
हे ही वाचा :