Latest
Gujarat earthquake | गुजरातच्या कच्छ भागाला भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर ४.१ तीव्रता
पुढारी ऑनलाईन : गुजरातच्या कच्छ भागाला आज सकाळी ८.०६ वाजता भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.१ इतकी होती. हा भूकंप भूगर्भात १५ किमी खोलवर झाला आहे, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे.

