Amritpal Singh : अमृतपाल सिंगची रवानगी आसाममधील दिब्रुगड कारागृहात

Amritpal Singh : अमृतपाल सिंगची रवानगी आसाममधील दिब्रुगड कारागृहात
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : वारीस दे पंजाब संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह याची रवानगी आज ( दि. २३ ) आसामच्या दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. आत्‍मसमर्पण केल्‍यानंतर पंजाब पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा त्‍याला अटक केली होती.  (Amritpal Singh)

अमृतपाल सिंग याला पंजाबमधील भटिंडा विमानतळावरून कडेकोट बंदोबस्तात डिब्रूगडमधील मोहनबारी विमानतळावर नेण्यात आले. पंजाब पोलीस आणि नॅशनल सिक्युरिटी एजन्सीच्या अधिकाऱ्यांचे पथकावर ही जबाबदारी होती. दरम्यान, आसाम पोलिसांचे मोठे पथक मोहनबारी विमानतळावर उपस्थित होते. दिब्रुगडमधील ज्या तुरुंगात अमृतपालला (Amritpal Singh) ठेवण्यात आले आहे, तेथे मोठी सुरक्षा व्यवस्था आहे. अमृतपालला येथे सीसीटीव्हीच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे.

दिब्रुगडमधील सर्वात सुरक्षित कारागृह (Amritpal Singh)

दिब्रुगडमधील संबंधित कारागृह पंजाबपासून शेकडो किलोमीटर अंतरावर आहे. अमृतपालला येथे सीसीटीव्हीच्या देखरेखेखाली ठेवण्यात येणार आहे. आसाम पोलिसांचे कमांडो तुरुंगाबाहेर तैनात आहेत. १८५९-६० मध्ये बांधलेले दिब्रुगड कारागृह हे सर्वात सुरक्षित कारागृह मानले जाते. पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात पकडलेल्या कैद्यांना राहण्यासाठी हे १८५७ पूर्वी बांधले गेले होते.

गुप्तचर संस्थांचे पथक अमृतपालची करणार चौकशी

दिब्रुगड कारागृह हे ईशान्येतील सर्वात जुने कारागृह आहे.  युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असोम इंडिपेंडेंट (ULFA-I) च्या अनेक प्रमुख नेत्यांना ठेवण्यासाठी ते वापरले जात होते. कारागृहातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनूसार, "अमृतपालला त्याच्या सहकाऱ्यांपासून दूर एका कोठडीत ठेवण्यात येणार आहे. याशिवाय आयबी, रॉ आणि इतर गुप्तचर संस्थांचे पथक दिब्रुगड कारागृह पोहोचून अमृतपालची चौकशी करणार आहे.

३६ दिवसांपासून फरार अमृतपाल सिंहला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. मोगा पोलिसांसमोर अमृतपालने सरेंडर केले. गेल्या 36 दिवसांपासून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत फरार असलेला अमृतपाल सिंह अखेर शरण आला.अमृतपाल  याने शनिवारी रात्री उशिरा मोगा मोगा गुरुद्वारा येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news