Latest

हॉटनेस नॉट अलाऊड : अनुषा दांडेकर हिचे बोल्ड व्हिडिओज व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन : पॉप्युलर व्हीजे आणि गायिका अनुषा दांडेकर हिचे बोल्ड व्हिडिओज व्हायरल झाले आहेत. अनुषा दांडेकर हिने काही हॉट फोटोजदेखील शेअर केले आहेत.

अनुषा दांडेकर

'बिग बॉस ओटीटी' मध्ये एंट्रीच्या आधी पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली होती. ती 'बिग बॉस ओटीटी'मध्ये एंट्री करणार होती. पण, तिने एंट्री केली नाही. पण, त्याआधी अभिनेता जेसन शाहशी तिचा ब्रेकअप झाला.

जेसनच्या आधी या अभिनेत्याला डेट

जेसनच्या आधी तिने अभिनेता करण कुंद्राला डेट केले होते. पण, नंतर दोघांचा ब्रेकअप झाला होता. तेव्हा अनुषाने करण कुंद्रावर तिला चीट करण्याचा आरोप केला होता.

'सुपरमॉडेल ऑफ दी इअर २' लवकरच भेटीला

'सुपरमॉडेल ऑफ दी इअर २' लवकरच भेटीला येत आहे. मलायका अरोरा, मिलिंद सोमण व अनुषा दांडेकरचे या शोतून कमबॅक करत आहे.

एमटीव्‍ही सुपरमॉडेल ऑफ दी इअर सीझन २ चा प्रतिष्ठित व बहुप्रतिक्षित पर्व येत आहे. २२ ऑगस्‍टपासून दर रविवारी सायंकाळी ७ वाजता फक्‍त एमटीव्‍हीवर प्रसारित होणार आहे.

सुपरमॉडेल ऑफ दि इअर सीझन २ मध्ये ब्‍लोनी, वैशाली एस, वेरंदाह, एसे, मेलोड्रामा, पापा डोण्‍ट प्रीच, अभिषेक स्‍टुडिओ आणि विरशेटे यांचा सहभाग आहे. हे सर्व तरुण, डिझायनर्स, उत्साही या शोचा स्‍तर उंचावणार आहेत.

यंदाच्‍या सीझनमध्‍ये स्‍पर्धकांच्‍या वैविध्‍यपूर्ण समूहाद्वारे मंचाची शोभा वाढवण्‍यात येणार आहे. पोलिसांपासून राष्‍ट्रीयस्‍तरीय बॉक्‍सर, राज्‍यस्‍तरीय स्प्रिंटर, हॉकी खेळाडू आणि ट्रान्‍सवूमन, यांच्याही समावेश असणार आहे. या शोमध्ये ग्‍लॅमर असणार आहे.

अनुषा दांडेकर म्‍हणते-'फॅशन हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला कलात्‍मकरित्‍या अभिव्‍यक्‍त करण्‍याचा मार्ग आहे. यामधून तुम्‍हाला आत्‍मविश्‍वास मिळतो. तुमची शैली व व्‍यक्तिमत्त्वाच्‍या माध्‍यमातून अभिव्‍यक्‍त होणे. ही मॉडेल्‍सची सर्वात मोठी सुपरपॉवर आहे. तुम्‍ही जे काही कराल ते फक्‍त सर्वोत्तमच असेल.

हेदेखील वाचा- 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT