सई ताम्हणकर  
Latest

समंदर में नहाके और भी..सई ताम्हणकरच्या नव्या फोटोंनी खळखळाट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन : नावाजलेली आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिची ओळख आहे. सई ताम्हणकर हिचे नाव मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत आहे. सईने नवे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. बीचवरील तिचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला 'खारट' कमेंट दिल्या आहेत.

समंदर में नहाके और भा नमकीन हो गई हो! अशी कमेंट्स नेटकऱ्यांनी तिला दिला आहे.

अधिक वाचा- 

सईने छोट्या पडद्यावरुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हळूहळू तिने स्वबळावर मोठ्या पडद्यावर जम बसवला.

अधिक वाचा-

मराठीसोबतच सईने हिंदीत देखील 'हंटर', 'लव्ह-सोनियो' सारख्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. काही चित्रपटात तिची बोल्ड भूमिका होत्या. मराठमोळी सईचा बोल्ड लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. समांतर २ मधील तिची भूमिका महत्त्वाची ठरली होती.

अधिक वाचा-

सईने तिचे वजन कमी करण्यासाठीही प्रचंड मेहनत घेतली आहे. ती आता पहिल्यापेक्षा सुंदर दिसतेय. व्हाईट आणि ब्लॅक कलरच्या वन पीसमध्ये सईने समुद्रात फोटोशूट केले आहेत. त्यातील काही निवडक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सईने छोट्या पडद्यावरून सुरुवात केली होती. सईला 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली. ती मूळची सांगलीची आहे. तिने मुंबईत आल्यानंतर प्रायोगिक नाटकांमध्ये काम केलं होतं. 

त्यानंतर एकांकिका आणि व्यवसायिक रंगभूमीवरदेखील अभिनय केलाय. टीव्ही मालिकांमध्ये तिने छोट्या भूमिकाही केल्या.

'मीमी' या चित्रपटात महत्वाची भूमिका

डिजीटल विश्वातदेखील तिने पाऊल ठेवले. मालिका, नाटके, चित्रपट आणि वेबसीरीज यासारख्या माध्यमातून ती चाहत्यांसमोर येतेय.
सईने नेटफ्लिक्सवरील 'मीमी' या चित्रपटात महत्वाची भूमिका बजावली आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

हेदेखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT