नल्‍लोर जिल्‍ह्यातील शेतकर्‍याने आपल्‍या शेतात चक्‍क सनी लिओनीचे बिकनीमधील पोस्‍टर लावली होती.  
Latest

सनी लिओनी हिचा ‘तो’ बिकिनीतील फोटो झाला होता प्रचंड व्‍हायरल

नंदू लटके

हैदराबाद; पुढारी ऑनलाईन : मॉडेल आणि अभिनेत्री सनी लिओनी हे नाव मागील काही वर्षातील बॉलीवूडमधील चर्चेतील नाव. इंटरनेटवर सर्वाधिक सर्च होणारी अभिनेत्री अशीही सनी लिओनी हिची ओळख आहे. विदेशात पॉर्न इंडस्‍ट्रीसमधून बॉलीवूडमध्‍ये आलेल्‍या सनीचे आपल्‍या देशातील फॅनची संख्‍या कोट्यवधीच्‍या घरात आहे. मात्र तुम्‍हाला माहित आहे का? २०१८मध्‍ये सनी लिओनी ही एक मजेशीर कारणासाठी चर्चेत आली होती.

 फोटोने उसळले होते हास्‍याचे फवारे 

सनी लिओनी चर्चेत येण्‍याचे कारणही तसेच होते. आंध्र प्रदेशमधील एका शेतकर्‍याने तिचे बिकिनी पोस्‍टर आपल्‍या शेतात लावले होते. या शेतातील सनीचा फोटो तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्‍हायरल झाला होता. या फोटोने हास्‍याचे फवारे उसळले होते.

बिकनी पोस्‍टर लावण्‍यामागील कारण मजेशीर….

२०१८मध्‍ये आंध प्रदेश राज्‍यातील नल्‍लोर जिल्‍ह्यातील बांदाकिदीपाल्‍ल्‍या गावातील रहिवासी असणार्‍या अक्‍कीनापल्‍ली चिनचू रेड्‍डी या शेतकर्‍याने आपल्‍या शेतात चक्‍क सनी लिओनीचे बिकनीमधील दोन मोठी पोस्‍टर लावली.

ही पोस्‍टर लागली आणि एकच चर्चा सुरु झाली. पोस्‍टर लावण्‍या मागील कारणही तेलगू भोषत पोस्‍टरवर नमूद करण्‍यात आले होते.

'माझ्‍यासाठी रडू नका किंवा माझा मत्‍सर करु नका' असे लिहले होते.

माझे दहा एकर शेत आहे. यंदा माझ्‍या शेतात चांगले पिक आले आहे.

माझ्‍या शेतातील फळभाज्‍यांना ग्रामस्‍थांची नजर लागू नये म्‍हणून मी सनी लिओनीचे बिकिनीमधील पोस्‍टर लावले.

आता सर्वांचे लक्ष माझ्‍या शेतमालाऐवजी सनीच्‍याच पोस्‍टरकडे जाते. त्‍यामुळेच हे पोस्‍टर मी लावल्‍याचे शेतकर्‍याने म्‍हटले होते.

त्‍यांनी सनीच्‍या पोस्‍टरचा वापर बुजगावण्‍यासारखा केल्‍याने हा फोटो तीन वर्षांपूर्वी प्रचंड व्‍हायरल झाला होता.

सध्‍या सनी लिओनी ही दाक्षिणात्‍य चित्रपटांच्‍या चित्रीकरणामध्‍ये व्‍यस्‍त आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ : बोरिवली मध्ये NO KISSING ZONE !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT