Latest

संजय दत्त : केजीएफ चॅप्टर २मधील ‘अधीरा’चा खतरनाक लूक व्हायरल

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडचा 'संजू बाबा' म्हणजेच अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आज (दि.२९ जुलै) रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने संजय दत्त यांनी केजीएफ: चॅप्टर २ या चित्रपटातील एक खतरनाक लूक शेअर केला आहे.

संजय दत्तने सोशल मीडियावर आगामी केजीएफ: चॅप्टर २ या चित्रपटातील नव्याने आणखी एक पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटात संजय दत्तने 'अधीरा'ची भूमिका साकरली आहे. या पोस्टरमध्ये अधीराच्या हातात दुहेरी तलवार असून डोळ्यावर चष्मा घातला असल्याचे दिसत आहे.

अधिक वाचा 

संजय दत्तने मानले आभार

संजय दत्तने या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. हे # केजीएफ चॅप्टर २वर आश्चर्यकारकपणे काम करत आहे. मला माहित आहे की, तुम्ही सर्वजण बर्‍याच काळापासून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत होतात आणि मी तुम्हाला खात्री देतो की, ही प्रतीक्षा व्यर्थ ठरणार नाही.

अधिक वाचा 

यासोबत संजय दत्तने वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून मिळालेल्या शुभेच्छाबद्दल धन्यवाद देखील दिले आहेत. काही मिनिटांपूर्वी व्हायरल झालेल्या या पोस्टरवर दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. या चित्रपटाची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अधिक वाचा 

याआधीही 'केजीएफ: चॅप्टर २' या चित्रपटाचे ब्लॅक अँड व्हाईट पोस्टर शेअर केले होते. यासोबत 'धन्यवाद यश, अधीरा म्हणून #केजीएफमध्ये सामील झाल्यामुळे खरोखर आनंदी आणि उत्साहित आहे. लवकरच भेटूया राक्षसाला'. असे लिहिले होते.

अभिनेता यश या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे, यश आणि संजय दत्तसोबत चित्रपटात अभिनेत्री रवीना टंडन दिसणार आहे.

याशिवाय संजय दत्त 'भुज : द प्राईड ऑफ इंडिया','शमशेरा' आणि 'पृथ्वीराज' या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT