शिवा काशिद यांची भूमिका साकारणार अभिनेता विशाल निकम  
Latest

शिवा काशिद यांची भूमिका साकारणार अभिनेता विशाल निकम

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : शिवा काशिद यांची भूमिका अभिनेता विशाल निकम साकारणार आहे. शिवा काशिद हा शिवरायांचा हा जिगरबाज मावळा हुबेहुब शिवरायांसारखा दिसायचा असं म्हंटलं जातं. त्यांनी महाराजांची पन्हाळ गडावरुन सुटका करण्यासाठी मदत केली होती. ही शौर्याची गाथा साकारण्यासाठी अभिनेता विशाल निकम सज्ज झाला आहे.

अधिक वाचा – 

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. हीचं गोष्ट सांगणारी जय भवानी जय शिवाजी मालिका २६ जुलैपासून सुरू होणार आहे.

रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर मालिका पाहता येईल. छत्रपती शिवरायांची भूमिका भूषण प्रधान साकारणार आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत अजिंक्य देव असणार आहे.

अधिक वाचा –

नेतोजी पालकरांची भूमिका कश्यप परुळेकर साकारणार आहे.

अभिनेता विशाल निकम

अभिनेता विशाल निकम म्हणतो- 

अभिनेता विशाल निकम म्हणाला, स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीसाठी मी खूपच आभारी आहे. पण, याआधी स्टार प्रवाहच्या साता जल्माच्या गाठी आणि दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे.

आता जय भवानी जय शिवाजी मध्ये शिवा काशिद साकारण्याची जबाबदारी आहे. स्वराज्य हे एकचं स्वप्न उराशी बाळगून हजारो मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

याच लढवय्या मावळ्यांची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे. इतिहास जिवंत होतोय असं म्हटलं तरी चालेल.

अधिक वाचा – 

शिवा काशिद यांच्या शौर्याविषयी आपण ऐकलं आहे. जय भवानी जय शिवाजी मालिकेच्या निमित्ताने ते प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

मी या नव्या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे. अशी भावना विशाल निकम याने व्यक्त केली.'स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची आहे. २६ जुलैपासून रात्री १० वाजता 'जय भवानी जय शिवाजी' फक्त स्टार प्रवाहवर.

अधिक वाचा – 

पाहा व्हिडिओ – वारकरी संप्रदायाकडूनच अस्पृश्यता निवारणाची प्रेरणा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT