संजय राऊत 
Latest

शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मीर पंडितांना वाचवा; संजय राऊतांचा भाजपला टोला

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : सध्या काश्मीरमधील स्थिती फारच गंभीर आहे. १९९० च्या दशकात होती तीच परिस्थिती आज काश्मीरमध्ये निर्माण झाली आहे. तुम्ही काश्मिरी पंडितांना घरवापसीबद्दल सांगितलं आणि त्यावर हिंदुत्वाच्या नावे मतंही मिळवली होती. पण त्याच्या सुरक्षेचं काय? असा सवाल करत शिवसेना प्रवक्ते आणि खा. संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मीर पंडितांना वाचवा, असेही त्यांनी म्हटले आहे.

खा. संजय म्हणाले, काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंरही काश्मिरी पंडित, तेथील जनतेच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. तेथील लोकांच्या जीवनात कोणतीही सुधारणा झालेली नाही. जर इतर पक्षाच्या राजवटीत हे हत्यासत्र झालं असतं तर, भाजपाने काश्मिरी पंडित, हिंहुत्वाच्या नावाने संपूर्ण देशभर गोंधळ घातला असता. पण काश्मीरमध्ये राज्य तुमचे असतानाही काश्मिरी पंडित जीव गमावत हे भयानक आहे, असेही मत राऊत यांनी व्यक्त केले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT