Latest

पैशातील नोटांमध्ये मेटेलिक दोर्‍याचा वापर का करतात?

Arun Patil

लंडन : छापील चलन म्हणजेच नोटेच्या मध्ये मेटेलिक दोर्‍याचा वापर हा सुरक्षेच्या कारणास्तव सुरू करण्यात आला. त्यावर काही कोड लिहिलेले असतात जे नोटांना सुरक्षा पुरवतात.

नोटांमध्ये मेटेलिक दोर्‍याचा उपयोग करण्याची कल्पना सर्वप्रथम इंग्लंडमध्ये सन 1848 मध्ये पुढे आली. मात्र, ती वापरात येण्यासाठी शंभर वर्षे लागली! मेटेलिक दोर्‍याचा उपयोग हा नकली नोटांना आळा घालण्यासाठी केला गेला होता.

'द इंटरनॅशनल बँक नोट सोसायटी' म्हणजेच 'आयबीएनएस' नुसार नोटांमध्ये धातूच्या स्ट्रीपचा वापर हा सर्वप्रथम 'बँक ऑफ इंग्लंड'ने सन 1948 साली सुरू केला. त्यावेळी नोटेवर एक काळी रेष असायची.

बनावट नोटांना आळा घालण्यासाठी तिचा वापर होता; पण त्यानंतरही बनावट नोट तस्करांनी नोटांवर काळ्या रेषा बनवून चलनात आणल्या. त्यामुळे पुन्हा नोटांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. 'बँक ऑफ इंग्लंड'ने 1948 साली वीस पौंडच्या नोटेवर मेटलचा धागा वापरला.

मात्र, तरीही बनावट नोटा चलनात येऊच लागल्या. तरीही धातूच्या धाग्याच्या नोटा वापरणं बंद झाले नाही. काही देशांनी धातुऐवजी प्लास्टिकची स्ट्रीप वापरणे सुरू केले. 1990 नंतर अनेक देशांनी याच पद्धतीचा वापर सुरू केला. त्याची मात्र अजून नक्कल होऊ शकलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT