Latest

दहा वर्षांमध्ये मंगळावर माणसाला नेण्याचा ‘या’ उद्योजकाचा दावा

निलेश पोतदार

वॉशिंग्टन :

सरत्या वर्षात टाईम मासिकाचे 'पर्सन ऑफ द इअर' ठरलेले धडाडीचे उद्योजक एलन मस्क यांनी म्हटले आहे की, दहा वर्षांमध्ये आपली 'स्पेसएक्स' ही अंतराळ कंपनी माणसाला मंगळभूमीवर नेईल. मस्क यांनी लेक्स फ्रिडमॅन पॉडकास्टवर याबाबतचा धाडसी दावा केला आहे.

'टेस्ला' आणि 'स्पेसएक्स'सारख्या कंपन्यांचे प्रमुख तसेच जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक अव्वल व्यक्ती असलेल्या मस्क यांचे विज्ञानावरील तसेच अंतराळ क्षेत्रावरील प्रेम जगजाहीर आहे. मंगळावर मानवी वसाहतीची स्वप्ने पाहणारा हा माणूस आपल्या कल्पना वास्तवात उतरवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आता मस्क यांनी म्हटले आहे की मानवतेला एक 'बहु-ग्रह प्रजाती' बनवले पाहिजे.

अंतराळप्रवासासाठी अद्ययावत तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी स्पेसएक्सच्या विस्तृत योजना आहेत. मंगळावर माणूस कधी जाणार याबाबत ते म्हणाले, सर्व काही अत्यंत सुरळीतरीत्या पार पडले व सर्वात चांगली स्थिती मिळाली, तर पाच वर्षांतच माणूस मंगळावर जाईल. मात्र, कठीण आव्हाने उभी राहिली तर दहा वर्षेही लागू शकतात. माणसाला अंतराळात नेणार्‍या सक्षम अंतराळयानाच्या निर्मितीवर सर्व काही अवलंबून आहे. 'स्टारशिप' हे आतापर्यंतचे सर्वात जटिल आणि प्रगत रॉकेट आहे. ते खरोखरच 'नेक्स्ट लेव्हल' आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT