murder 
Latest

तोंडात गॅसची पाईप घालून शरीराला चटके देत केली पत्नीची हत्या

Arun Patil

ठाणे ; पुढारी ऑनलाईन : मुंब्रा परिसरात एक अत्यंत भयानक व क्रूर घटना समोर आली आहे. प्रेमविवाह केलेल्या एका नराधमाने पत्नीची हत्या केली. हत्या केल्यानंतर आपल्या गावी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना मुंब्रा पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली. आरोपीला कोर्टाने ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमविवाह करुन आपत्यासह मुंब्रा परिसरातील जीवनबाग येथे राहणाऱ्या सदफ आणि आणि शाहनवाज यांचा संसार सुरु होता. त्या दोघांना एक मुलगीही झाली. त्यानंतर मात्र त्या दोघामध्ये वारंवार भांडणे सुरू झाली. या सततच्या भांडणामुळे त्या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले.

सततच्या भांडणामुळे वैतागलेल्या शाहनवाजने आपल्या पत्नीचा काटा काढण्याचे ठरविले. पत्नीला मारण्यासाठी घरातील सिलेंडरची गळती करुन बनाव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने आपल्या मुलगीला सोबत घेवून उत्तर प्रदेशातील आपल्या मूळगावाच्या दिशेला निघाला होता. पोलिसांना या गोष्टीची माहिती मिळताच त्याचे मोबाईल लोकेशन ट्रेस करून आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने आरोपी शाहनवाज याला मध्यप्रदेशातील इटारसी स्टेशनवरच अटक केली.

शाहनवाज याला अटक केल्यानंतर त्याला मुंब्रा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर आरोपी शाहनवाज याला न्यायालयाने ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

आरोपी शहनवाज सैफी व त्याची पत्नी सदफ सैफी हे दोघे आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह मुंब्रा येथील जीवन बाग बुरहाणी इमारतीत राहत होते. या दोघांनी दोन वर्षापुर्वी प्रेमविवाह केला होता. पण या दोघांमध्ये काही दिवसांपासून वारंवार भांडणे सुरू होती. १ सप्टेंबर रोची त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं.

या भांडनानंतर शाहनवाजने पत्नीला थेट संपवण्याचा कट रचला. यानंतर पत्नीला आधी झोपेचं औषध दिलं. पत्नी बेशुद्ध झाल्यानंतर तिच्या तोंडात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची पाईप घातली. असे करत त्याने शरीराला वेगवेगळ्या ठिकाणी जाळले. असे कृत्य करून त्याने घराच्या दरवाज्याला लॉक करून आपल्या दोन वर्षांच्या मुलीला घेऊन घराबाहेर पडला. पत्नीची हत्या केल्यानंतर तो आपल्या उत्तर प्रदेश येथील गावी पळून जात होता.

आरोपी शाहनवाजला अटक

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी घराचे लॉक तोडून त्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. तो मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयाच पाठवला.त्यानंतर पोलिसांनी शाहनवाजचे मोबाईल लोकेशन ट्रेस केले. पोलिसांना लोकेशन ट्रेस करण्यात यश आलं. त्याचे लोकेशन मध्यप्रदेशमधील इटारसी रेल्वे स्थानकात असल्याचं दिसत होतं. पोलिसांनी तातडीने इटारसी आरपीएफसोबत संपर्क साधला व त्यांना घटनेची माहिती दिली.

आरपीएफच्या जवानांनी शाहनवाजला ताब्यात घेतले व त्यांनी त्याला मुंब्रा पोलीस ठाण्यात हजर केले. यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT