सुखापुरी; पुढारी वृत्तसेवा वडिलांच्या मालकीची 2 एकर शेती नावावर करून देत नसल्याचा रागतून सावत्र भावाचा रूमालाने गळा आवळून नाका तोंडात माती कोंबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विराज कुढेकर (८ वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. ऋषिकेश कुढेकर याने जगन्नाथ जाधव यांच्या उसाच्या शेतात नेऊन हात रुमालाने गळा आवळून नाका तोंडात माती भरून विराज कुढेकरला ठार मारल्याची घटना अंबड तालुक्यातील भार्डी या गावात घडली.
या विषयी अधिक माहिती अशी की, गोंदी पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत कावेरी तुकाराम कुढेकर यांनी म्हटले आहे की, भार्डी येथील तुकाराम कुढेकर यांची पहिली पत्नी रेखा अंकुश बोबडे ही तुकाराम यांना सोडून निघून गेली होती. यानंतर तुकाराम यांनी कावेरी हिच्यासोबत दुसरे लग्न केले. पहिल्या पत्नीपासून झालेला दुसरा मुलगा ऋषिकेश कुढेकर (१८) हा आई रेखासोबत छत्रपती संभाजीनगर येथे राहत होता. तर दुसरी पत्नी कावेरी हिचा मुलगा विराज कुढेकर हा भार्डी येथे आई-वडिलांसोबत राहत होता. दरम्यान पहिल्या पत्नी रेखाचा तुकाराम यांच्यासोबत शेतीच्या वाटणीवरून कोर्टामध्ये वाद सुरू होता. त्यातच पहिल्या पत्नीचा मुलगा ऋषिकेश कुढेकर हा अधूनमधून गावाकडे येत होता. तो जमिनीच्या वाटणीवरून वडिलांशी वाद घालायचा.
मागील 3 महिन्यांपूर्वी रेखाचा मुलगा ऋषिकेश हा भार्डी येथे गावाकडे राहावयास आला. केव्हा-केव्हा तो छत्रपती संभाजीनगर येथे देखील जायचा. आईने 2 एकर आमच्या वाट्याची जमीन माझ्या नावे करण्यास सांगितले आहे असे बोलायचा. जमीन नावावर करण्यासाठी आधार कार्ड आणण्यासाठी गेलेला ऋषिकेश गावांत परतला. यावेळी दुसऱ्या पत्नीचा मुलगा विराज तसेच मुलगी शाळेत गेले होते. मात्र मनात सुडभावना असल्याने ऋषिकेशने स्वतःच्या लहान सावत्र भावाला दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जगन्नाथ जाधव यांच्या उसाच्या शेतात गोड बोलून कशाचे तरी आमिष दाखवून नले. या ठिकाणी त्याने विराजचा हात रुमालाने गळा आवळून नाका तोंडात माती भरून त्याला ठार मारले.
संशयीत आरोपी ऋषिकेश तुकाराम कुढेकर व त्याची आई रेखा तुकाराम कुढेकर रा.राजनगाव बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर यांच्या विरुद्ध खुणाचा गुन्हा गोंदी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लंके हे करीत आहेत.
आरोपी ऋषिकेश तुकाराम कुढेकर व त्याची आई रेखा तुकाराम कुढेकर रा.राजनगाव बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर यांच्या विरुद्ध खुणाचा गुन्हा गोंदी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास लकें करीत आहेत.
हेही वाचा :