Loksabha : लोकसभेत आज वित्त विधेयक मांडले जाणार | पुढारी

Loksabha : लोकसभेत आज वित्त विधेयक मांडले जाणार

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली, दि. 23 संसदेच्या उभय सदनातील कोंडी कायम असली तरी विनियोग विधेयक 2023 लोकसभेत मंजूर करण्यात सरकारला गुरुवारी यश मिळाले. गदारोळातच आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर झाले. दरम्यान वित्त विधेयक शुक्रवारी लोकसभेत मंजुरीसाठी आणले जाणार आहे. तिकडे संसदेतील कोंडीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत चर्चा केली.
दिवसभर लोकसभेचे कामकाज बाधित झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी कामकाज सायंकाळी सहा वाजेपर्यंत तहकूब केले होते. सहा वाजता कामकाजास सुरुवात झाल्या झाल्या वेळेअभावी मंत्रालय निहाय तरतुदी घेण्याऐवजी एकत्रित तरतुदी घेतल्या जाणार असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले. यावर गदारोळातच आवाजी मतदानाने मंजुरी घेण्यात आली.
Loksabha : पंतप्रधानांची बिर्ला यांच्यासोबत चर्चा….
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी घातलेल्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज प्रभावित झालेले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. यावेळी वरिष्ठ मंत्री राजनाथ सिंग, प्रल्हाद जोशी, किरेन रिजिजू हेही उपस्थित होते. ही एक सदिच्छा भेट होती, असे नंतर भाजप सूत्रांकडून सांगण्यात आले.

Back to top button