अश्विनी जाधव यांनी मिनी टेम्पोवर अनोख्या पद्धतीने तयार केलेला 11 बाय 17 फुटांचा स्टेज 
Latest

चालता-फिरता मंडप स्टेज बनवून गृहिणीने निवडला रोजगाराचा अनोखा पर्याय

अमृता चौगुले

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी झालेल्या एका उच्च शिक्षित गृहिणीने नोकरी न करता बँकेतून कर्ज घेऊन एक टेम्पो खरेदी करत त्यावर आपल्या बुद्धीचा वापर केला. जिद्दीच्या जोरावर चालता-फिरता मंडप ( स्टेज ) उभा करून कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून हा पर्याय निवडल्याचे या गृहिणीने सांगितले. 34 वर्षीय अश्विनी सचिन जाधव असे या गृहिणीचे नाव असून ती कल्याण पूर्वेतील विजयनगर भागात त्या कुटुंबासह राहते.

कोरोना काळात केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केला होता. त्यामुळे देशभरात सर्व व्यवसाय ठप्प होऊन लाखो कुटूंब यामुळे कर्जबाजारी झाले आहेत. तर हजारोंच्या नोकऱ्या जाऊन अनेक जण बेरोजगार झाले. त्यामध्ये उच्चशिक्षित गृहिणी अश्विनी यांचे कुटूंबही कर्जबाजारी झाले. त्यातच पतीच्या पगारावर घर खर्च भागवणे जिकरीचे झाले. त्यामुळे या कुटुंबाला आर्थिक चणचण भासत होती. मात्र खचून न जाता एक तर नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय निवडण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी व्यवसायासाठी एका बँकेकडून 6 लाख रुपये कर्ज घेऊन एक मिनी टेम्पो खरेदी केला. या टेम्पोवर आणखी १ लाख रुपये खर्च करून त्याला मंडप (स्टेज) चे स्वरूप दिले. ( चालता-फिरता मंडप )

या टेम्पोचा उपयोग छोट्या छोट्या कार्यक्रमासाठी स्टेज म्हणून वापरता येईल, शिवाय केवळ 20 ते 30 मिनिटांत टेम्पोचा स्टेज केला जातो. आजच्या घडीला मंडप अथवा स्टेजचा खर्च सर्व सामान्य नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे या टेम्पोचा स्टेज स्वतः दरात त्यांनी कार्यक्रम करणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिला. टेम्पोचा स्टेज 11 बाय 17 असून यावर छोटे सभा-सभारंभ होऊ शकतात, असेही अश्विनी यांनी सांगितले. तसेच अनेक सर्वसामान्य कुटुंबांना विविध कार्यक्रम करताना खर्चामध्ये बचत करणारी ही संकल्पना असून यापासून आमच्या कुटूंबालाही उपजिविकेचे साधन मिळाल्याचेही सांगितले. एकंदरीतच एका उच्च शिक्षित गृहिणीने खचून न जाता कुटूंबाला हातभार लावण्यासाठी जो पर्यायी निवडला त्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसांडून दिसून आला. या गृहिणीचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. ( चालता-फिरता मंडप )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT