Latest

कंगना रानौतच्या कारवर शेतकऱ्यांनी केला हल्ला; माफी मागून झाली मार्गस्थ

backup backup

वाचाळ अभिनेत्री कंगना रानौतच्या कारवर पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. कंगनाने या हल्ल्याचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ती मनालीहून चंदीगढकडे जात असताना ही घटना घडली. शेतकरी आक्रमक झाल्यानंतर कंगना माफी मागून मार्गस्थ झाली.

श्री किरतपूर साहिबमधील बुंगा साहिब येथे शेतकऱ्यांनी अभिनेत्री कंगना राणावतच्या ताफ्याला घेराव घातला. त्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी जमले. त्यामुळे चंदीगड-उना महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कंगनाने शेतकरी आणि महिलांची माफी मागावी, या मागणीवर आंदोलक ठाम होते. अखेर तिने माफी मागून मार्ग मोकळा करून घेतला.

रोपड शहराजवळच्या बुंगा साहिबमध्ये कंगनाची गाडी शेतकऱ्यांनी अडवली. कंगना मनालीहून चंदीगढ विमानतळाकडे जात होती. ती विमानाने मुंबईला जाणार होती. मात्र, ताफ्यात कंगना आहे हे कळताच शेतकऱ्यांनी तिची कार अडवली.

शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनाने अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली होती. आंदोलनासाठी १०० रुपये देऊन महिलांना आणले जाते, आंदोलन करणारे खलिस्तानी अतिरेकी आहेत, अशी वादग्रस्त विधाने तिने केली होती.

कंगना रानौतच्या कारवर हल्ला: काय म्हणाली सोशल मीडियावर

या घटनेबाबत तिने सोशल मीडियावर लिहिले असून त्यात ती म्हणते, 'मी हिमाचल प्रदेशातून चंदीगढकडे निघाले होते. पंजाबमध्ये येताच मला जमावाने घेरले. ते शेतकरी असल्याचं सांगत आहेत. शिवीगाळ करत आहेत.

जीवे मारण्याची धमकी देत आहेत. देशात अशा प्रकारे मॉब लिंचिंग होत आहे. माझ्यासोबत सुरक्षा रक्षक नसते तर काय स्थिती झाली असती? येथे मोठ्या संख्येत पोलीस आहेत. तरीही जाऊ दिलं जात नाही. मी कोणी राजकीय नेता आहे का? अनेक जण माझ्याविरोधात राजकारण करत आहेत. त्याचाच हा परिणाम आहे. जमावाने मला घेरले आहे. आणि पोलीस नसते तर माझे आत्तापर्यंत मॉब लिंचिंग झाले असते.'

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT