आझम खान  
Latest

उ. प्रदेश जल आयोग भरती घोटाळा प्रकरणी आझम खान यांच्‍या अडचणीत वाढ

नंदू लटके

लखनौ; पुढारी ऑनलाईन : उ. प्रदेश जल आयोग घोटाळा प्रकरणी समाजवादी पार्टीचे ज्‍येष्‍ठ नेते आझम खान यांना
भोवण्‍याची चिन्‍हे आहेत. १ हजार ३०० कोटी रुपयांच्‍या उ. प्रदेश जल आयोग घोटाळा प्रकरणी लखनौमधील सीबीआयच्‍या विशेष न्‍यायालयाने आजम खान यांना समन्‍स बजावली आहे.

अधिक वाचा 

जल आयोग घोटाळ्यातील संशयित आरोपी आझम खान यांच्‍यासह अन्‍य आठ संशयित आरोपींविरोधात लवकरच खटला सुरु हाेणार आहे.

सोमवार, १९ जुलैपासून सीतापूर कारागृहात व्‍हिडीओ कॉन्‍फरसिंगच्‍या माध्‍यमातून ही सुनावणी होईल. अन्‍य आरोपींना ३ ऑगस्‍ट रोजी हजर राहण्‍यासाठीवचे समन्‍स बजावण्‍यात आले आहेत. तत्‍कालीन समाजावादी पार्टीच्‍या सरकार काळात  हा भरती घोटाळा झाला होता.

अधिक वाचा 

याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) आझम खान यांच्‍यासह जल आयोगाचे अभियंते गिरीश चंद्र श्रीवास्‍तव, नीरज मलिक, विश्‍वजीत सिंह, अजय कुमार यादव, संतोष कुमार रस्‍तोगी, रोमन फर्नांडीज आणि कुलदीप सिंह नेगी या संशयित आरोपींविरोधात दोषारोपपत्रही दाखल केले आहे.

याप्रकरणी आझम खान यांच्‍याविरोधात १८ नोव्‍हेंबर २०२० रोजी वॉरंट जारी झाले होत. आझम खान हे अन्‍य घाेटाळा प्रकरणी यापूर्वीच सीतापूर कारागृहात आहेत.

काय आहे जल आयोग भरती घोटाळा ?

उत्तर प्रदेश जल आयाेग

उत्तर प्रदेशमध्‍ये समाजावादी पार्टीचे सरकार असताना जल आयोग विभागात भरती झाली होती.

भरती करताना खासगी संस्‍था आणि जल आयोगाने नियमांचे उल्‍लंघन केले. विविध पदांसाठी परीक्षा घेण्‍यात आली. मात्र ऑनलाईन उत्तरपत्रीकाच जाहीर करण्‍यात आली नाही.

यानंतरही भरती प्रक्रिया राबविण्‍यात आली.

संबंधित खासगी  संस्‍थेच्‍या अधिकार्‍यांनी उमेदवारांची माहिती असणारा डेडाच गहाळ झाला. यानंतर अपात्र ठरलेल्‍या उमेदवारांचे गुण वाढवून पात्र ठरविण्‍यात आल्‍याचा आराेप झाला.

सर्व निकषच पायदळी तुडवत आझम खान यांनी भरती केल्‍याचा आरोप करण्‍यात आला होता.

तात्‍कालिन नगरविकास मंत्री आझम खान व संबंधित अधिकार्‍यांवर भरती घाेटाळ्यात सहभागाचा गुन्‍हा दाखल झाला.

आझम खान हे समाजावादी पार्टीचे प्रमुख नेत्‍यांपैकी एक आहेत.

समाजावादी पार्टीचे तात्‍कालिन अध्‍यक्ष मुलायम सिंह यादव त्‍यांचे निकटवर्ती म्‍हणूनही त्‍यांची ओळख आहे.

अखिलेश यादव यांच्‍या नेतृत्‍वाखालील सरकारमध्‍ये आझम खान यांनी महत्‍वाच्‍या खात्‍यांची जबाबदारी संभाळली हाेती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT