पुणे ; पुढारी वृत्तसेवा : विक्रीसाठी बेकायदेशिर गांजा, चरस आणि हशिश तेल असे अमली पदार्थ बाळगणार्या हरियाणा, गोवा, चेन्नईतील तिघांना गुन्हेशाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक १ ने अटक केली. त्यांच्याकडून ३ लाख २३ हजार रूपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
नासिर नुरअहमंद शेख (३०, रा. अमित अस्ट्रोनिया क्लासिक सोसायटी, वडाचीवाडी रोड, उंड्री, मुळ रा. गोवा ), पुनित सतबीर कादयान (३५, रा. सर्व्हे नंबर व्यकटेशभुमी ब्लीस सोसायटी, मुळ रा. मांजरा ता. बेरी राज्य हरियाणा) आणि शरत विजयन नायर (३४, रा. कृष्णानगर, एलआयसी नगर, चेन्नई) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
मंगळवारी अमंली पदार्थ विरोधी पथकातील अमंलदार योगेश मोहिते यांना अटक करण्यात आलेले आरोपी त्यांच्या राहत्या घरी अमंली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार नासिर शेख याच्या घरातून १ किलो ६०० ग्रॅम गांजा, तीन ग्रॅम १०० मिली अशिश तेल, मोबाईल वजनकाटा जप्त करण्यात आला.
पुनित कादयान व नायर यांच्या घरातून ३ किलो ५०० ग्रॅम गांजा, ८ ग्रॅम चरस, मोबाईल, वजनकाटा तसेच ७ ग्रॅम चरस रोख रक्कम असा ३ लाख २३ हजारांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
तिघांवरही कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, अमंलदार सुजित वाडेकर, संदीप जाधव, राहुल जोशी, विशाल दळवी यांनी ही कारवाई केली.
हे ही पाहा :