Goa CM Pramod Sawant Security  
अपडेट्स

ST Reservation Goa | गोवा एसटी आरक्षणाचा मार्ग मोकळा! दोन दिवसांत अधिसूचना निघणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

ST Reservation Goa | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ६ सप्टेंबरला गोवा दौऱ्यावर; भाजप मुख्यालयाचे करणार उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

दिल्ली भेटीमध्ये राज्यातील आदिवासी (एसटी) समाजाला राजकीय आरक्षण देण्याची प्रक्रिया जलद करावी, या मागणीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आगामी निवडणुकीत निश्चितपणे एसटींना राजकीय आरक्षण मिळेल. अमित शहा हे ६ सप्टेंबर रोजी गोव्यात येत असून, त्या दिवशी भाजपच्या चिंबल पठारावरील मुख्यालयाचे उद्घाटन ते करतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

येत्या निवडणुकीपूर्वी निश्चितपणे एसटींना राजकीय आरक्षण मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी भाजप कार्यालयाचे उद्घाटन करतील. त्यानंतर ७ रोजी सकाळी गोव्यात तीन वर्षांत दुसऱ्यांदा आयोजित पश्चिम विभाग कौन्सिल बैठकीचे अध्यक्षस्थान ते भूषवतील.

बैठकीला गुजरात, राजस्थान, गोवा आदी राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होतील. त्यानंतर संध्याकाळी प्रेसिडेंट कलर या पोलिसांच्या कार्यक्रमामध्ये अमित शहा हे सहभागी होणार आहेत. गोवा भेटीमध्ये शहा हे भाजप नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्याची शक्यता आहे.

तसेच केंद्रीय रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे चतुर्थीपूर्वी गोव्यात येणार असून, चतुर्थीपूर्वी ते पर्वरी उड्डाणपुलाचे उद्घाटन करणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

दोन दिवसांत अधिसूचना

बुधवारी दिल्लीतून गोव्यात पोहोचल्यानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. सावंत यांनी सांगितले की, एसटींना राजकीय आरक्षणाची प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी आपण दिल्लीला गेलो होतो. त्याबाबत अमित शहा यांना विनंती केली. त्यानुसार त्यांनी कायदा खात्याला तसे आदेश दिलेले आहेत. कायदा खाते दोन दिवसांमध्ये अधिसूचना काढणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT