तळणी ः मंठा तालुक्यातील टाकळखोपा येथे अवैध वाळु साठे करण्यात आल्याचे दिसत आहे  (छायाः रवि पाटील)
अपडेट्स

Illegal sand mining : पुर्णा नदी पात्रात वाळु माफीया सक्रिय;25 ब्रास अवैध साठा जप्त

मंठयाच्या तहसीलदार सुमन मोरे यांच्याकडून कारवाया होत नसल्याचा ग्रामस्थांतुन आरोप

पुढारी वृत्तसेवा

तळणी : मंठा तालुक्यातील टाकळखोपा गावात पूर्णा नदी पात्रातील अवैध वाळू उत्खननाचा खेळ भरदिवसा सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खंडोबा मंदिरासमोरील सार्वजनिक जागेवर वाळु माफीयांनी अवैध वाळूचे साठे केले असुनही त्यावर कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमधे आश्चर्य व्यक्त होत आहे.

टाकळखोपा येथील शासनमान्य वाळू घाटांमधून विक्री बंद असतानाही पूर्णा नदी पात्रातून उत्खनन सुरूच असल्याचे पहावयास मिळत आहे. एकीकडे रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ उपोषणाला बसलेले असताना दुसरीकडे नदीतून अवैधरित्या वाळू उपसली जात असल्याने संतापाची लाट पसरली आहे. मंठयाच्या तहसीलदार सुमन मोरे यांच्याकडून कारवाया होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांतुन होत आहेत. शेकडो ब्रास वाळूची साठवणूक आणि विक्री सुरू असतानाही प्रशासन मौन असल्याची टीका होत आहे.

टाकळखोपा येथे 25 ब्रास अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला असून, वरिष्ठांच्या आदेशानुसार तो घरकुल किंवा शासकीय कामांसाठी देण्यात येणार आहे. वाळु साठा संबंधित साठा पोलीस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी संदीप आंदेलवाड यांनी दिली.

वाळु चोरीचे प्रकार पूर्णा नदी काठावरील अनेक गावांत वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी पुर्णा नदी पात्रातील गावातुन करण्यात येत असल्याचे दिसत आहे.

अवैध वाळुचे ट्रक

पुर्णा नदीतील वाळू माफियांचे अवैध ‌‘साम्राज्य‌’ नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहे असा प्रश्न ग्रामस्थांतुन विचारला जात आहे. शासनाकडुन वाळु बंद असतांनाही रस्त्यावर मोठया संख्येने वाळुचे हायवा, ट्रक व ट्रॅक्टर धावतांना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT