Persistent IT Company Success Story PUDHARI
अपडेट्स

Persistent IT Company Success Story: एका डीलमुळं पुण्याची Persistent कशी बनली देशातील ७ वी सर्वात मोठी IT कंपनी?

Anirudha Sankpal

Persistent IT Company Success Story: एका डीलमुळं पुण्याची IT कंनी पर्सिस्टंटने मोठी झेप घेतली आहे. आता पर्सिस्टंट ही कंपनी देशातील सातवी सर्वात मोठी आयटी कंपनी झाली आहे. मुळची पुण्याची असलेली ही पर्सिस्टंट कंपनी 'नॅगारो' (Nagarro) मधील २१% हिस्सा तिचा सर्वात मोठा भागधारक 'लॅन्टा-नो बेटिलिगंगेन' (Lanta-no Beteiligungen) कडून खरेदी करण्याचे आधीच मान्य केले आहे, आणि यानंतर उर्वरित समभागांसाठी (Shares) ती ऐच्छिक सार्वजनिक टेकओव्हर ऑफर (स्वैच्छिक सार्वजनिक संपादन प्रस्ताव) जारी करेल. हा व्यवहार 'गॅलेक्सी जर्मनी होल्डिंग' (Galaxy Germany Holding) या नव्याने स्थापन केलेल्या जर्मन उपकंपनीच्या माध्यमातून पूर्ण केला जाईल.

हा व्यवहार अत्यंत महत्वाचा मानला जात असून कदाचित पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या भारतीय आयटी कंपनीने युरोपातील कंपन्यांना टेकओव्हर केलं आहे. यापूर्वी भारतीय कंपन्या युरोपातील कंपन्या टेक ओव्हर करत असत. मात्र आता हा ट्रेंड उलटा करण्यात पुण्याच्या प्रेसिस्टंटला यश आलं आहे. नॅगारो कपंनीचे सीमन्स (Siemens), लुफ्तान्सा, बीएमडब्लू, मारुती सुझुकी, बजाज फिन सर्व्ह, Assa Abloy आणि सिटी ऑफ न्यूयॉर्क हे महत्वाचे ग्राहक आहेत

जसं एलटीआय माईंडट्री मर्जर आणि कॉफोर्जचे एनक्रोओ होल्डिंग मर्जर झाले त्याप्रमाणे प्रेसिस्टंटने नॅगरोच्या खरेदीसाठी तीन मुख्य रणनैतिक उद्येश ठेवले होते. यात स्केल वाढवणे, युरोपात आपली उपस्थिती आणि डिजीटल इंजिनिअरिंग आणि ai क्षमता वाढवणे.

दरम्यान, प्रेसिस्टंटे सीईओ संदीप कालरा यांनी सांगितलं की, 'आम्ही कायम सांगत होतो की आम्हाला तंत्रज्ञानातील सर्वोत्तम सेवा देणारी कंपनी व्हायचं आहे. आम्हीला सर्वसाधारण आयटी सेवा पुरवणारी कंपनी व्हायचं नाहीये. आता आम्गी जगातील दुसरे सर्वात मोठे इंजिनिअरिंग प्लेअर्स झालो असून भारतात लिस्ट झालेली सातवी सर्वात मोठी टेक्नॉलॉजी सर्व्हिस कंपनी झालो आहेत.

या मर्जरचा व्यवहाराला वित्तपुरवठा हा ब्रिज फायनान्सिंग फॅसिलिटी द्वारे करण्यात आला. यासाठी १.४ बिलियन युरोज हे बारक्लेस बँक वित्तपुरवठा करण्यात आळा. यासाठी प्रेसिस्टंटने १.५ बिलियनची कॉर्पोरेट गँरेंटी दिली आहे. यासाठी कंपनीला ४.१ के ४.५ टक्के वार्षिक व्याज द्यावं लागणार आहे.

नॅगारोने आपले स्टेक्स विकण्याचा निर्णय का घेतला यााबबत सांगताना सहसंस्थापन ह्युमन म्हणतात, 'युरोपात कॅपिटल उभं करणं खूप आव्हानात्मक आहे. दुसरं म्हणजे आम्हाला नवीन एआय ट्रान्सफॉर्मेशनच्या जमान्यात डिजीटल इंडिनिअरिंगच्या पुढे जाऊन संधी शोधणं गरजेचं आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT