कूलरच्या पाण्यातून दुर्गंधी येतेय? मग 'हा' छोटा तुकडा टाका, पाणी राहील नेहमी स्वच्छ file photo
अपडेट्स

Cooler Water Cleaning Tips : कूलरच्या पाण्यातून दुर्गंधी येतेय? मग 'हा' छोटा तुकडा टाका, पाणी राहील नेहमी स्वच्छ

कूलरमधील पाण्याची योग्य स्वच्छता न ठेवल्यास त्‍यामधून दुर्गंधी येउ शकते.

पुढारी वृत्तसेवा

Is your cooler water emitting a foul odor? Then drop 'this' small piece in—the water will always remain clean

पुढारी ऑनलाईन :

उन्हाळा सुरू झाला की घरातील कूलर बाहेर काढले जातात. कडक उन्हात कूलरची थंड हवा दिलासा देते, पण कधी-कधी त्याच हवेला वास येऊ लागतो. यामागचं मुख्य कारण म्हणजे कूलरमधील पाण्याची योग्य स्वच्छता न ठेवणे. त्यामुळे कूलर आजारांचे घर बनू शकतो.

कूलरच्या हवेत जाणवणारी दुर्गंधी ही त्याच्या टाकीत साचलेल्या पाण्यामुळे येते. या पाण्यात डास वाढू लागतात, ज्यामुळे हवेची गुणवत्ता खराब होते. अनेकांना कूलर साफ करण्याचा त्रास वाटतो, पण एक सोपा घरगुती उपाय करून तुम्ही ही समस्या सहज दूर करू शकता.

कूलरचे पाणी स्वच्छ ठेवण्याचा सोपा उपाय

कूलरचे पाणी दीर्घकाळ स्वच्छ आणि ताजे ठेवण्यासाठी त्यात तुरटीचा (Alum) एक छोटा तुकडा टाका. हा उपाय स्वस्त, सोपा आणि प्रभावी आहे. तुरटीमुळे पाण्यातील घाण खाली बसते आणि पाणी बराच काळ स्वच्छ राहते. त्यामुळे वारंवार पाणी बदलण्याची गरजही कमी होते.

तुरटी का फायदेशीर आहे?

  1. पाणी स्वच्छ करते: तुरटीमुळे पाण्यातील सूक्ष्म कण एकत्र येऊन खाली बसतात, त्यामुळे वरचे पाणी स्वच्छ दिसते.

डास वाढण्यापासून रोखते: कूलरच्या पाण्यात डास होण्याची शक्यता कमी होते.

दुर्गंधी कमी करते: पाण्यातील वास कमी करून ते ताजे ठेवते.

बॅक्टेरिया नियंत्रणात ठेवते: े तुरटीमध्ये हलके अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे हानिकारक जंतू कमी करतात.

कूलिंग सुधारते: स्वच्छ पाण्यामुळे कूलरची थंड हवा अधिक चांगली मिळते आणि पॅड्सही जास्त काळ टिकतात.

हा छोटासा उपाय करून तुम्ही तुमचा कूलर स्वच्छ, सुगंधी आणि अधिक प्रभावी ठेवू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT