डॉ. सौ. सपना गांधी
नैसर्गिकरीत्या वय जसजसे वाढत जाते तसतशी झोप कमी कमी होत जाते; पण जर लहान वयात/तरुण व प्रौढ वयात अनिद्रेची तक्रार सुरू झाली तर फार समस्या निर्माण होऊ शकतात व तो एक जटिल आजार, गंभीर समस्या असू शकते. जीवनावर फार वाईट परिणाम होण्यास सुरुवात होऊ शकते.इन्सोमनिया म्हणजेच झोपेच्या तक्रारी. लवकर झोप न लागणे किंवा लवकर जाग येणे, रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर होत राहणे. मध्यरात्री जाग आली तर परत लगेच झोप न लागणे व पहाटे पहाटेच झोप लागणे. सकाळी उठल्यावर फ्रेश न वाटणे, मरगळ्याने दिवसभरातील कामात लक्ष न लागणे, सारखी सारखी चिडचिड होणे, डोके जड जड होणे, डोळेही जडजड होणे, दिवसाही झोप न लागणे याचा परिणाम साहजिकच नेहमीच्या कामावर होऊन काम बिघडणे.
इन्सोमनियाची कारणे बरीच आहेत. जसे की, स्ट्रेस, डिप्रेशन, झोपेच्या अनियमित वेळा, जागरणाची सवय. जसे की, मोबाईलवर गेम खेळणे, यूट्यूब पाहणे, फोनवर तासन्तास बोलत राहणे. मानसिक कारणे जसे की, विनाकारण काळजी, चिंता, उदासीनता, शारीरिक आजारपण, दुखणे आजाराचे टेन्शन, एखाद्या गोष्टीची भीती.
* इन्सोमनियाचे तीन प्रकार आहेत.
1. र्ढीीपीळशपीं खर्पीीापळर – एक आठवड्याच्या आतला.
2. अर्लीींश खपीेापळर – थोड्या दिवसांपुरता मर्यादित असणारा.
3. उहीेपळल खर्पीीापळर – खूप दिवसांच्या /खूप महिन्यांची/ खूप वर्षांची तक्रार असणारी.
शारीरिक तक्रारी – जसे की, एखादे दुखणे, त्यामुळेही झोपमोड होत राहते.
डायबेटीस – वारंवार बाथरूमला उठावे लागणे.
कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेम, दमा, थायरॉईड, पार्किन्सन्स, अल्झेइमिरस असे बरेच आजार की, ज्यामध्ये झोपमोड होते.
घरगुती उपचार –
प्रथम तुम्ही रोजचे झोपेचे वेळापत्रक फिक्स करून त्याचप्रमाणे फॉलो करणे. रोज अॅक्टिव्ह राहणे, व्यायाम करणे. दिवसा झोपणे टाळा. कॉफी/दारू व्यसन थांबवा. रात्री खूप असा जड आहार टाळा/झोपेच्या आधी तीन तास तरी जेवण करून घ्या. रात्री हलका आहार घ्यावा. रात्री झोपताना व उठताना 10-15 मिनिटे ध्यान करावे. रात्री झोपताना व सकाळी उठताना 10-15 मिनिटे ध्यान करावे. रात्री झोपताना दूध/बदाम असे घेऊन झोपल्यास झोप छान लागते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये झोपेच्या तक्रारी जास्त आहेत.
* कमी झोपेचे शरीरावर होणारे दुष्परिणाम – ब्लड प्रेशर, डायबेटीस, लिव्हर प्रॉब्लेम, वजन वाढणे, डिप्रेशन, ताण, डोळे सतत तारवरत राहणे.
1. नक्स व्होमिका (Nux Vomica) – अपचनाच्या तक्रारी, गॅस, अॅसिडिटी, मळमळ, झोप अपुरी झाली, जागरण झाले की, शिवाय चिडचिड होऊन दुसर्या दिवसाच्या कामावर वाईट परिणाम होतो. हे लोक बिझनेसमॅन, बैठे काम करणार्यांतील जास्त असतात. त्यांना व्यसनही असते. जसे की, गुटखा/दारू/स्मोकिंगची सवय असते.
2. नॅट्रम मूर(Nat Mur) – या शक्यतो लेडीज ग्रुपमध्ये जास्त दिसतात. खूप विचार करणार्या, हळव्या स्वभावाच्या असतात. जरा कोणी बोलले तर मनाला लावून घेत तेच विचार करून, दुःखी होणार्या, उष्ण प्रकृतीच्या असून त्यांना ब्लड प्रेशर सारखा आजार असू शकतो. खूप विचार करतात.
3. कार्सिनोसिन (Carcinocin) – या प्रकारचे पेशंट खूप दुर्धर आजाराने त्रस्त असतात. जसे की, कॅन्सर. या दुखण्यानेही त्यांच्या झोपेच्या तक्रारी असतात. शिवाय प्रेमभंगाच्या घटनेचाही त्यांच्यावर खूप दुष्परिणाम होऊन अनिद्रेची शिकार होतात.
4. हायोसायमस (Hyosymus) – बिनधास्त प्रकृतीचे असतात. आपल्याच विश्वात मग्न असतात. खाणे-पिणे, दारूची सवय असते. पिऊन बडबड करणे, गाणे म्हणणे असे केल्याने त्याचा झोपवर परिणाम होतोच.